जालना । प्रतिनिधी – मौजे वाघ्रुळ ता.जि.जालना येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांच्या हस्ते पार पडला.
वाघ्रुळ गावासाठी खासदार निधी रंगनाथ महाराज मंदिरास सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी 10 लक्ष्य रुपयांचा निधी, सी. सी. रोड च्या बांधकामासाठी 7 लक्ष्य रुपये, त्याचप्रमाणे 9515 योजनेअंतर्गत रंगनाथ महाराज मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 10 लक्ष्य रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच गावकर्यांच्या मागणीनुसार श्रीधर खरात यांच्या घरापासून शरद खरात यांच्या एजंसीपर्यंत सिमेंट रोड चे बांधकाम करण्यासाठी खासदार निधी अंतर्गत 5 लक्ष्य रुपये निधी मंजूर करण्यात आला होता, यावेळी या सर्व झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
तसेच गावामध्ये तीर्थक्षेत्र योजनेंतर्गत सी.सी. रोड व भूमिगत नालीचे बांधकाम करण्यासाठी 10 लक्ष्य रुपये, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सी. सी. रोड चे बांधकाम करण्यासाठी 5 लक्ष्य रुपये, दलितवस्ती अंतर्गत आंबेडकर नगर येथे भूमिगत नालीचे बांधकाम करण्यासाठी 10 लक्ष्य रुपये व दलितवस्ती अंतर्गत महात्मा फुले नगर येथे भूमिगत नालीचे बांधकाम करण्यासाठी 10 लक्ष्य रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी या सर्व कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदी यांच्या सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास या संकल्पास सर्वोत्परी मानून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघांतील अल्पसंख्यांक समाज, आर्थिक दुर्बल घटक, महिला, गरीब कल्याण, युवा व कामगार यांचे सशक्तिकरण, समृद्धी, समान अधिकार, सुविधा, स्वास्थ सेवा या माध्यमातून जनसामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी नेहमीच कार्य केले आहे.
दादांच्या नेतृत्वात जालना जिल्ह्याला विकासाला नवसंजीवनी लाभली आहे. त्यांच्या माध्यमातून रेल्वे, रस्ते, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, नियमित पाणीपुरवठा या सर्व प्रश्न सुटून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत आहे. असे प्रतिपादन यावेळी मा. भास्कर दानवे पाटील यांनी यावेळी केले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष वसंतराव शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, कपिल दाहेकर, सुधाकर खरात, कैलास उबाळे, कृष्ण खिल्लारे, बद्री वाघ, मुकेश चव्हाण, गोपाळ चौधरी, रामजी शेजूळ, श्रीराम वाघ, करण निकाळजे, बालाजी आगाव, नागेश अंभोरे, निवृत्ती लंके,सतीश केळकर, लहू राठोड, विलास कापसे, मुरली सहारे, तुकाराम खरात, शिरसाट गंगाधरे, विठ्ठल इंदरकर, संभाजी वाघ, शरदराव खरात, गणेश तिडके, अमोल खांडेभराड, संजय खरात, शिवाजी खरात , राम केळकर, कांताराव जाधव, राधेशाम खरात, जगदीश खरात, जगदीश शेवाळे, संजय खरात, कैलास खरात, विश्वनाथ खलसे, बापूराव केळकर यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.