ज्ञानासाठी विद्यार्थ्यांनी पेटून उठलं पाहिजे – उद्योगपती रायठ्ठा, आदर्श शिक्षक शेख जमीर सर यांच्या सत्कार

5

जालना । प्रतिनिधी – गुरु शिष्य परंपरा संस्थेमार्फत टेंभुर्णी येथील आदर्श शिक्षक, नवभारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शेख जमीर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. यांच्या या सेवानिवृत्तीबद्दल आणि सेवापूर्ती कार्याबद्दल त्यांचा या संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योगपती सुनील रायठ्ठा हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बोलताना आजच्या शिक्षण संस्थेची व्यथा ते मांडत असताना सांगितले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी पेटून उठायला सांगा,
आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये काही बदल करायला सांगितले, ज्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी हा वावरताना दिसतोय त्याच्यात बदल घडायला हवा. ज्ञान कौशल्य यासारख्या गोष्टीकडे त्याचे मन वळवा. ज्ञानार्जनासाठी त्याला पेटून उठायला शिकवा. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असतांना शिक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले असतांना त्यांनी शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये रमून जात शिकवायला पाहिजे. शेख यांच्याबद्दल त्यांनी आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये सेवावृत्ती भाव ठेवल्या त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतांना असाच सेवाभावी वृत्ती सर्व शिक्षकांनी जागृती करायला हवी असेही मत त्यांनी मांडले. सेवानिवृत्त शिक्षक आदर्श शिक्षक श्री जोशी यांनीही शिक्षणाबद्दल आपली मत व्यक्त केली.
शिक्षणाची शिक्षण कार्यशाळा भरली पाहिजे, ज्यांनी शिक्षणात योगदान दिले जे शिक्षणात योगदान देऊ शकतात अशांची आज शिक्षण क्षेत्रामध्ये गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या सत्काराला उत्तर देताना शेख सर यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की की शिक्षणामध्ये मी सेवाभावी वृत्ती लक्षात घेऊनच पूर्ण संपूर्ण कार्य केले आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणूनच मी कार्य केले आहे. या गुरु शिष्य परंपरेच्या निमित्ताने भरलेल्या या कार्यक्रमांमधून शिक्षणाबद्दलची अनास्थांमध्ये बदलायला हवी हासूर प्रत्येक वक्त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास उपस्थित त्यामध्ये किशोर खंडाळे, सुनील रायठा, सेवानिवृत्त शिक्षक जोशी सर, जगत घुगे, किशोर आगळे, डावरगाव चे आदर्श शिक्षक गोविंद जाधव, आदींची आवर्जून उपस्थिती होती. क्रमाचे सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले. प्रास्ताविक ढाकरके सर यांनी केले.