जालना । प्रतिनिधी – देशाला आज क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या विचारांची खरी गरज आहे. तरुणांनी देशातील थोर स्वतंत्र सैनिकांचा इतिहास आत्मसात केल्यास देशभक्ती निर्माण होण्यासाठी फार मोठी मदत होईल असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी केले.
क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची शनिवार रोजी जयंती दिनानिमित्त सिगलीकर समाज यांच्या वतीने छ. संभाजी उद्यान (मोतीबाग)येथील आयोजित कार्यक्रमात श्री.खोतकर हे बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणालेकी, देशाच्या क्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास सर्व दूर पोहचवण्यासाठी सामजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद भगतसिंग यांच्या प्रतीमेस श्री. खोतकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . कार्यक्रमाच्या प्रस्ताविक संदीप सिंग भादा यांनी करतांना सागितले कि,जालना जिल्ह्यामध्ये शहीद भगतसिंग यांचे स्मारक नाही त्यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा याप्रसंगी न.प गट नेते गणेश राऊत, पंडित भुतेकर, बंडू मोहिते, शिवप्रसाद चित्तोळकर, अँड अशपाक पठाण, सिगलिकर समजाचे अध्यक्ष संतोष सिंग कलानी, सय्यद जावेद अली, बाबासाहेब सोनवणे, सतनाम सिंग टाक, गुर्मीत सिंग सेना, अजित सिंग कलानी, गुर्मीत सिंग कलानी, करण सिंग भोंड, तारण सिंग कलानी, जित्तू सिंग टाक, गोपी सिंग कलानी आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सिंग कलानी यांनी केले.