जालना । प्रतिनिधी – शहरातील अंबड चौफुली परिसरात पोलीसांनी शनिवार (दि.28) रोजी सकाळी पावणे आठ वाजता संशयितरित्या आढळून आलेल्या एका वाहनावर कारवाई करून वाहनासह दोन आरोपी ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधतांना दिली.
सदर वाहनामध्ये प्राण्याची हाडे रचुन ठेवलेली तसेच हाडाला लागलेले मास कुजून त्यात आळ्या पडलेले आयशर वाहन क्र.चक13उण1622 वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने धोकादायकरित्या वाहन चालवुन कुजलेले जनावरांची हाडे मानवी जिवितास धोका असलेल्या रोगांचा संभव असलेली घातकी कृती केले म्हणून तालूका जालना पोलीस ठाण्यात पो.हेड का. सदाशिव राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहमंद ताहा इम्तियाज अन्सारी, दिलसार अक्तर अली हाश्मी दोन्ही रा. इदगाह रोड गवळी पाडा भिवंडी यांच्या विरोधात भा.न्या.सं.कलम 272, 281 सह 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका कांगणे हे करीत आहेत.