पोस्ट पार्सलद्वारे आलेल्या तीन तलवारी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

29

जालना । प्रतिनिधी – अवैध शस्त्रे बाळगणार्‍या आरोपीतांची माहिती घेऊन शोध घेत असतांना खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरपी रोड वरील एका घरातून तीन तलवारी जप्त करण्यात आल्या आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार (दि 28) रोजी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध शस्त्रे बाळगणार्‍या आरोपीतांची माहिती घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबण्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिलेेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी गुन्ह शाखेचे एक पथक निर्माण केले. या पथकाला खबर्‍यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, राहुल नटवरलाल व्यास रा. आरपी रोड जालना. याने पोस्ट पार्सलद्वारे धारदार तीन तलवारी मागविलेेल्या आहेत. याबाबत वरिष्ठांना कळवून पथकातील अधिकार्‍यांनी हेड पोस्ट ऑफिस मधून माहिती घेतली असता तीन तलवारीचे पार्सल हे आरपी रोड वरील राहुल व्यास यांच्या घरी पाठविले असल्याचे पोलीसांना कळाले. त्यांनतर राहुल व्यास यांच्या घराची झडती त्याच्या घरातून खाकी रंग असलेल्या पुठ्ठ्ायच्या बॉक्समध्ये अंदाजे पाच हजार रु. किंमतीच्या तीन धारदार तलवारी मिळून आल्या. या तीन तलवारी पोलीसांनी जप्त केल्या आहेत. आरोपीविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि श्री. योगेश उबाळे, पोउपनि श्री. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, देविदास भोजणे, सतिश श्रीवास, सोपान क्षिरसागर, धीरज भोसले आदींनी केली आहे.