जालना । प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जालना जिल्हयातील 5180 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत नुकताच शासनाने निर्णय दिला आहे, यामध्ये जालना विधानसभा (101) क्षेत्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मा केंद्रिय राज्यमंत्री मा.श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे यांनी वारंवार पाठपुरावा करुन विधानसभा क्षेत्रातील वाघ्रूळ, बाजीउम्रद तांडा, सावंगी तलाव, दहीफळ, पिरपिंपळगांव, साळेगांव नेर, बठाण बु., पारेगांव, सामनगांव, धावेडी, वखारी वडगांव, निरखेडा तांडा, नंदापूर, घाणेवाडी, गवळी पोखरी, गोंदेगांव, वडगांव (वखारी) ,पानशेंद्रा, पाहेगांव, वरखेड सिं. , मजरेवाडी, वरुड, देवमुर्ती, मानेगांव जहागिर या गावांमधील एकूण 520 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले असून यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे, त्यांचे राहणीमान उंचावे, त्यांचे उत्पन्न स्त्रोत वाढावे, त्यांना स्थिरता प्राप्त करून देणे. यासाठी त्यांना जमीन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करून देणे व त्या ठिकाणी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यावेळी गावकर्यांनी भास्कर आबांचा सत्कार करुन समस्त गावकर्यांच्या वतीने आभार मानले. या प्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायकजी मुळे, मुकेश चव्हाण, बद्रीनाथ वाघ, संजय डोंगरे, कृष्णा गायके, नागेश अंभोरे, दीपक पाडूळ, विष्णु राठोड, सुमित सुराडकर, यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.