परतूर । प्रतिनिधी – विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 करिता परतुर विधानसभा मतदारसंघात 2425 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून वैयक्तिक घरकुल लाभार्थ्याच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्या करिता प्रति लाभार्थी 01 लाख 20 हजार रुपये प्रमाणे 29 कोटी 10 लाख रुपये तर 4 टक्के प्रशासकीय निधी रुपये 4800 प्रति घरकुलाप्रमाणे रुपये असे एकूण 1 कोटी 16 लक्ष 40 हजार इतक्या निधीस मान्यता देण्यात आली असून प्रति घरकुलास प्रत्येकी 4826 रुपये प्रमाणे 01 कोटी 17 लाख 3 हजार 50 रु एकूण 30 कोटी 26 लाख 40 हजार इतका निधी प्राप्त झाला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात दिली आहे
मागील अनेक दिवसांपासून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलांच्या मंजुरी संदर्भातील मागणी केली जात होती त्यानुसार आमदार लोणीकर यांनी सदरील विभागाकडे या संदर्भातील पाठपुरावा करून या घरकुलांना मंजुरी मिळवून दिली आहे या योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आली असून जिल्हास्तरीय समितीने छाननीअंती सदरील घरकुलांना प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याचे देखील लोणीकर यांनी स्पष्ट केले
जालना जिल्ह्यात एकूण 5180 घरकुल मंजूर करण्यात आले असून त्यापैकी परतुर विधानसभा मतदारसंघात 2425 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील एकूण घरकुलांसाठी 64 कोटी 64 लाख 64 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी एकट्या परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 30 कोटी 26 लाख 40 हजार रुपये निधी मंजूर मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे
परतुर विधानसभा मतदारसंघात अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना 1848 घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी प्रत्येकी 1 लाख 20 हजार रुपये प्रमाणे 22 कोटी 17 लाख 60 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. या दोन्ही योजनांमध्ये 4273 घरकुलांना मंजुरी देण्यात आला असून त्यासाठी एकूण 52 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, अशी माहिती देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात दिली आहे
संबंधित सर्व लाभार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देताना संदर्भीय शासन निर्णय व शुद्धिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन करता येणार नाही तसेच या लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटींची पूर्तता झाल्याची खातरजमा झाल्यानंतर त्यांना कार्यारंभ आदेश वितरित करण्यात येतील असेही लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे