जालना । प्रतिनिधी – शहरात श्रीमंतसंघटनेचे मोठे जाळे असून या संघटनेचे प्रमुख संदीप साबळे व संघटनेचे सर्व पदाधिकारी महीला कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आपल्याला मोठी ताकद मिळाली असून या संघटनेने माझ्यावर व शिवसेना पक्षावर योग्य वेळी जो विश्वास दाखवून शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे मी श्रीमंत संघटनेचे प्रमुख संदीप साबळे व त्यांच्या सर्व संघटनेच्या बंधू-भगिनीचे मनापासून शिवसेना पक्ष स्वागत करतो. व त्यांना शुभेच्छा देतो. या संघटनेच्या पदाधिकार्यांनी आपल्यावर योग्य वेळी विश्वास दाखवून शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यांचा या पक्षात योग्य सन्मान केला जाईल, त्यांचा विश्वासघात होणार नाही अशी ग्वाही देतो, असे शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्रीअर्जुनराव खोतकर यांनी पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
श्रीमंत संघटनेचे प्रमुख संदीप साबळे यांनी व त्यांच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढून शिवसेना पक्षात दर्शना बंगल्यावर अर्जुनराव खोतकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला. सर्वांचे अर्जुनराव खोतकर यांनी स्वागत केले .यावेळी युवासेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर, दलित आघाडी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव मगरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख कालींदाताई ढगे, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहिते, महिला आघाडी शहर प्रमुख उज्वलाताई फोपलीया ,माजी नगरसेवक निखिल पगारे, विजय जाधव, संजय गायकवाड, ऍडवोकेट आस्पाक पठाण, माजी नगरसेवक विजय जाधव, ऍडवोकेट बबन मगरे, ताहेर खान, युवा सेनेचे राहुल, वैद्य दिपक गवारे,कुणाल जाधव, जाफरखान संतोष परळकर यांची उपस्थिती होती.
प्रसंगी श्रीमंत संघटनेचे प्रमुख संदीप साबळे म्हणाले की, आम्ही संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सतत सहभागी असतो संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतो. विद्यमान आमदार दलित मुस्लिमांच्या मतावर निवडून आले आहेत. परंतु त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात प्रश्न सोडवण्याचे काम तर दूरच परंतु कधी त्यांची साधी भेटही होत नाही. त्यामुळे आपण व आमच्या संघटनेने जनसेवेचे सतत कार्य करणारे सामान्याचे प्रश्न सोडवणारे शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहून येणार्या निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून आणायचे असा निर्धार केलेला आहे. यावेळी अॅड. भास्करराव मगरे, माजी नगरसेवक निखिल पगारे यांनी देखील मार्गदर्शन केले.