जालना | प्रतिनिधी- भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेशरैया यांची जयंती दि. 15 सप्टेंबर रोजी क्रेडाई जालनातर्फे अभियंता दिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी क्रेडाईचे अध्यक्ष अभय कुलकर्णी होते. अध्यक्ष भाषणात ते म्हणाले की, सर विश्वेश्वरअय्या यांनी जे महान कार्य केले, तशाच पद्धतीने अभियंत्यांनी काम करून आपला नावलौकीक वाढवावा. अभियंता रविंद्र हुशे यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेशरअय्या यांचे जीवन चरित्र व त्यानी केलेल्या कामा विषयी माहीती विषद केली. याप्रसंगी क्रेडाईचे सदस्य असलेल्या सर्व अभियंत्यासह क्रेडाईचे सचिव अविनाश भोसले, माजी अध्यक्ष संजय मुथा, सहसचिव शरद जैस्वाल, दिपक अंभोरे, अकींत आबड, नितीन सातपुते, सुशील पितांबरे, सत्कारमूर्ती रितेश मंत्री, विनोद यादव, सय्यद महेबुब, कैलास पवार, गोपाल पवार, अनुराग अग्रवाल, पकेंश खुरूद, अवेश नाथानी , शरद बारगजे, वैभव बंब, संदीप राठी, दिपक बदर यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रेडाई जालनाचे उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल पवार यांनी केले.