मंठा । प्रतिनिधी – एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन शहरा सोबतच ग्रामीण भागात गतिमान पध्दतीने पायाभूत सुविधा पुरवत आहे. गाव पातळीवर नेतृत्व करणार्या तरुणांनी शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास करून विकासाचा आराखडा तयार करावा, मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळून देण्यास आपले प्रयत्न कमी पडणार नाही. अशी ग्वाही शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी आज दिली. नायगाव येथे रविवार (ता.15) शाखा उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना म्हणाले. व तसेच
मा राज्यमंत्री अर्जुनराव
खोतकर व शिवसेना जिल्हाप्रमुख मोहनजी अग्रवाल, मा सभापती प्रल्हादरावजी बोराडे, यांच्या माध्यमातून मंठा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन युवकांची मोठी फळी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी बोलताना सांगितले.
मंठा तालुक्यात शिवसेना शिदे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. तसेच शेतकर्यांचे ही अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.तसेच मुख्यमंत्री वैदाकिय सहायता निघी मधून देखील भरपूर रुग्णांना लाभ भेटलेला आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्वच जाती धर्माचे युवा तरुणांना रोजगारीचा लाभ मिळाला असल्याने शिवसेने विषयी
जनसामान्य लोकांची सहानुभूती ची लाट निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे सर्व तालुका पदाधिकारी सामान्य जनतेच्या संपर्कात असून त्यांच्या अडचणी वरिष्ठांपर्यंत नुसत्या पोहोचवत नसून तर त्या सोडविण्यासाठी ही प्रयत्न करत आहे. शिवसेनेचे विचार तळागाळात जावे यासाठी शिवसेना – युवासेना मंठा तालुक्याच्या वतीने एक आगळे वेगळे अभियान सुरू करून युवकांची मोठी फळी निर्माण करणार असल्याचे तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी सांगितले. यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख योगेश गणगे, शिवसेना उप तालुकाप्रमुख रामराव वरकड,दलित आघाडी तालुका प्रमुख दिलीप हिवाळे, भीमराव वाघ, संजय राठोड, पवन खरात, सुनील गुंड व गावातील शाखा पदाधिकारी, माजी सरपंच प्रल्हाद सांगळे, शंकर राठोड, नारायण राठोड, महेश राठोड, तुकाराम फुफाटे, प्रदीप राठोड, गणेश राठोड, भागवत राठोड, राजकुमार राठोड, समाधान राठोड, गणेश घुगे, युवराज राठोड, रामेश्वर राठोड, संदीप चव्हाण, संपत आढे, उमेश राठोड, ऋषिकेश सांगोळे, श्रीराम चव्हाण, रामराव चव्हाण, अशोक मगर, छगन राठोड,