आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाफराबाद येथे शिवसेनेची आढावा बैठक

12

जाफराबाद । प्रतिनिधी – येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 14 रोजी शिवसेनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. 2024 मध्ये येणार्‍या विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी साठी बैठकीत उपजिल्हाप्रमुख रमेश पा. गव्हाड हे मार्गदर्शन करत असताना पुढे म्हणाले की, भोकरदन जाफराबाद हा विधानसभा मतदार संघ सुरवातीपासूनच भगव्याच्या विचाराचा असुन शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून अशी या मतदार संघाची ओळख आहे.आजही या मतदार संघात नेते जरी कमी झाले असले,तरी बाळासाहबांच्या विचाराने प्रेरित होऊन उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदार राजा बहुसंख्येने शिवसेनेच्या पाठीशी खंबीर पने उभा असल्याचे अनेक निवडणुकीत दाखऊन दिले आहे. त्यामुळे हा मतदार संघ आघाडी मध्ये शिवसेनेसाठी सोडण्यात यावा या साठी वरिष्ठांकडे आग्रही राहणार आहोत असेही यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत रमेश गायकवाड, राजु सोनवणे, रमेश धवलिया, शिवाजीराव गावंदे, उत्तमराव वानखेडे, परमेश्वर जगताप, मनीष श्रीवास्तव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर यावेळी जाफराबाद शहरातील भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश दिवटे व युवा मोर्चा चे मुकेश माकोडे, यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात आला आहे.
उपस्थितांमध्ये उपजिल्हाप्रमुख रमेश पा. गव्हाड,मनीष श्रीवास्तव परमेश्वर जगताप,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे,माजी समाजकल्याण सभापती रमेश धवलीया,माजी तालुका प्रमुख शिवाजीराव गावंदे, तालुकाप्रमुख कुंडलिक पा. मुठ्ठे, मंगेश गव्हाड,जेष्ठ शिवसैनिक हरीचंद्र पा म्हस्के,माजी प स सदस्य रमेश गायकवाड,शहर प्रमुख देवीसिंह बायस, उपतालुकाप्रमुख चंदू पा शिंदे,शिवाजी पा म्हस्के, बाबासाहेब बोरसे,परमेश्वर सरोदे, समाधान पा सवडे, विष्णु पा लोखंडे,मोहम्मद फैसल,शेख इरफान, युवा तालुका पदाधिकारी देविदास सवडे, नागोराव बंगाळे, गणेश सवडे,दामू आण्णा उबाळे, यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते…..