टेंभुर्णी । प्रतिनिधी – पहाट फाऊंडेशन छत्रपती संभाजीनगर च्या वतीने उत्कृष्ट शैक्षणिक व सामजिक कार्यासाठी देण्यात येणारा पहाट महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार टेंभुर्णी येथील युगंधर प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन विनोद कळंबे यांना शनिवारी ता.14 छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.यावेळी चैत्राम पवार,डॉ जीवन राजपूत,मारुती म्हस्के,प्रसिद्ध कवी दंगलकार नितीन चंदनशिवे,प्राचार्य डॉ. पी. एम. शहापूरकर,प्रा रमेश गावित,अर्पिता सुरडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.श्री विनोद कळंबे हे खानापूर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.ग्रामस्थांचे सहकार्य व लोकसहभाग या माध्यमातून खानापूर शाळेचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केलेले आहे.याशिवाय युगंधर प्रतिष्ठान च्या माध्यमातून शेकडो कोरोना योध्यांचा सन्मान,ऊसतोड मजुरांच्या फडावर दिवाळी,शेकडो गरजू रुग्णांना आर्थिक मदत यासह शेकडो पदवीधर युवकांसाठी घरपोच पदवी अभियान याशिवाय पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडलेली आहे असे अनेक सामजिक उपक्रम त्यांनी राबविले आहे त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल जाफराबाद तालुक्यातील सर्व स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.