आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून 53 ग्रामपंचायत इमारती बांधकामासाठी 10 कोटी 95 लक्ष रुपये निधी मंजूर

19

परतूर
गाव पातळीवर ग्रामीण भागातील जनतेचे कामे सुरळीतपणे पार पडावी यासाठी परतूर मंठा जालना ग्रामीण मधील नवीन ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतींना मंजुरी भेटली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पुढे या पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना, सरपंच उपसरपंच सदस्य व प्रशासकीय अधिकार्‍यांना काम करण्यासाठी उत्तम व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी या नवीन इमारतीचा उपयोग होणार असून या माध्यमातून गाव गाड्यांचा कारभार जलद गतीने चालावा अशी अपेक्षा असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्रकार नमूद केले आहे. मंठा तालुक्यातील अर्डा खारी (20) लक्ष, कटाळा बुद्रुक(20) लक्ष जांभरुण(20) लक्ष ठेंगेवडगाव (20) लक्ष पोखरी टकले (20) लक्ष केंदळे पोखरी(20) माळकिनी(20) लक्ष रामतीर्थ (20) लक्ष वाटुर तांडा(20) हनवत खेडा(20) अंभोरा शेळके( 20) लक्ष केहाळ वडगाव (20) कीर्तापूर(20) लक्ष करणावळ (20) लक्ष गुळखंड (20) लक्ष टोकवाडी (20) लक्ष टाकळखोपा(20) लक्ष तळतोंडी (20) लक्ष दहा (20) लक्ष पाडळी दुधा (20) लक्ष गडदे पांगरा (20) लावणी(20) लक्ष लिंबे वडगाव (20) लक्ष वीरगव्हाण(20)लक्ष वाघोडा तांडा (20) सोनूनकरवाडी (20) लक्ष दहिफळ खंदारे (25) लक्ष पांगरी बुद्रुक(25) लक्ष माळेगाव (25) लक्ष शिवनगिरी(25) हेलस (25) लक्ष तर परतूर तालुक्यातील बामणी (20) हनुवडी(20) लक्ष श्रीधर जवळा (20) अंगलगाव (20) आसनगाव (20) लक्ष सावरगाव बुद्रुक (20) माव पाटोदा (20) लक्ष चांगतपुरी (20) लक्ष फुलवाडी (20) लक्ष मापेगाव बुद्रुक (20) लक्ष डोलारा (20) लक्ष परतवाडी (20) तर जालना ग्रामीण तालुक्यातील नेर शेवली भागातील शंभू सावरगाव (20)लक्ष सोनदेव (20) लक्ष ढगी (20)लक्ष पळसखेडा (20) लक्ष काकडा (20) लक्ष डांबरी (20) लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला असून लवकरच नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.