गोंदी पोलीस स्टेशन हद्दीतील रोड रॉबरी चा गुन्हातील फरार प्रमुख आरोपी सचिन गणेश पोखरकर अटकेत

23

भारत फायनान्स ची लुटमारी करणारे 2 आरोपी यांचेकडून भाग्यनगर ते घुगडेहादगाव रोडवर दिनांक 16/08/2023 रोजी रात्री 09.00 वाजे सुमारास भारत फायनान्स चे कर्मचारी यांना आडवुन त्याचे कडील रोख रक्कम व मोबाईल टॅब असा 3,51000/- रुपये किमंतीचा मुददेमाल बळजबरीने हिसकावुन नेले वरुन गोंदी पोस्टे येथे गुरन 355/2023 कलम 392,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयात यापूर्वी आरोपी नामे 1. सुदर्शन ज्ञानेश्वर पोखरकर वय 23 वर्षे, 2. आकाश गणेश पोखरकर वय 23 वर्षे दोन्ही रा. मंठजळगाव ता. अंबड यांना अटक करण्यात आलेली असून गुण्यातील प्रमुख फरार आरोपी सचिन पोखरकर याचा शोध घेत होते त्यास गोंदी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून *गुन्ह्यात वापरलेली 4,00000/-< रकमेचे स्विफ्टकार* हे चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेले आहे.सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक श्री अजय कुमार बन्सल सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री आयुष नोपाणी सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री विशाल खांबे सो, यांचे मार्गदर्शनखाली सपोनि आशिष श्रीनिवास खांडेकर यांनी केला असुन त्यांना तपास दरम्यान पोउपनि बालाजी पद्मने, पोउपनि बलभीम राऊत, पोहेकॉ 1563 अशोक नागरगोजे, पोकॉ/पठाडे, पोकॉ/14 सिध्दीकी, पोकॉ/अशोक कावळे, पोकॉ सचिन साळवे सर्व नेमणूक गोंदी पोलीस स्टेशन यांनी मदत केली आहे.