श्रीगोंदा – जिल्हा अहिल्या नगर येथून प्रकाशित होणार्या वादळी स्वातंत्र्याच्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांना वादळी सन्मान पुरस्काराने सुवर्णाताई पाचपुते, दिग्विजय नागवडे, साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यचे संपादक जितेंद्र पितळे, उपसंपादक बाळाप्रसाद मंत्री, बाळासाहेब नाहटा, आदर्श शिक्षक रामदास ठाकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यचा विशेष अंक प्रसिद्ध करण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात काम करणार्या मान्यवर व्यक्तींना वादळी सन्मान पुरस्कार देण्यात आला. श्याम ठाणेदार हे साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यमध्ये नियमित लेखन करतात. स्तंभलेखन करतात. साप्ताहिक वादळी स्वातंत्र्य मध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत म्हणूनच त्यांना वादळी पुरस्काराने गौविण्यात आले आहे. श्याम ठाणेदार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.