भोकरदन । प्रतिनिधी – तालुक्यातील वडोत तांगडा येथील जिल्हा परिषद शाळा प्रथम सविस्तर वृत्त असे की गेले आठ दिवस मुख्यमंत्री सुंदर शाळा ,माझी शाळा या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांनी आपली नोंदणी करून त्याच्या पुनर्मुल्यांकनासाठी केंद्र स्तर, तालुकास्तर ,जिल्हास्तर असे मूल्यांकन करण्यात आले या मूल्यांकनात जि.प.कें.उ.प्रा.शा.वडोद तांगडा ही शाळा प्रथमतः केंद्र स्तरातून प्रथम येऊन तिचे मूल्यांकन तालुकास्तरीय समिती द्वारा करण्यात आले. यामध्ये शालेय परिसर ,विद्यार्थी गुणवत्ता, भौतिक सुविधा अशा सर्व स्तरावरून जेव्हा तालुकास्तरीय समितीने मूल्यांकन केले त्या मूल्यांकनाद्वारे सदरील शाळेला तालुका स्तरातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा वडोद तांगडा या शाळेचा परिसर ,भौतिक सुविधा व विद्यार्थी गुणवत्ता ही खरोखर अतिशय दर्जेदार व उत्तम प्रकारची आहे या शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्याध्यापक जे वाय सय्यद व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर पवार ,उपाध्यक्ष विजय सपकाळ व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ मनीषा वास्कर, उपसरपंच नाना तांगडे सदस्य नारायण तांगडे तसेच सर्व सदस्य,संपूर्ण गावकरी, पालक वर्ग ,विद्यार्थी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन शिक्षणप्रेमी संपूर्ण गावचे मार्गदर्शक डॉ सी आर तांदूळजे वर्धमान वास्कर, माजी सरपंच रामधन मुर्हाडे रामेश्वर भवर व सर्व शिक्षण प्रेमी नागरीक तसेच गावातील सर्व मित्र मंडळ, अॅडव्होकेट , यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेसाठी अनेक प्रयत्न करत, मदत देत शाळेची गेल्या पाच वर्षापासून शाळेचा सर्वांगीण विकासाचा ध्यास मनात घेऊन ही शाळा आदर्श बनवली आहे .पंचक्रोशीतील शाळा , शालेय व्यवस्थापन समित्या शालेय परिसर, विद्यार्थी गुणवत्ता तसेच भौतिक सुविधांचा आढावा घेण्यासाठी व या शाळेतील उपक्रम आपल्या शाळांमध्ये राबवण्यासाठी या शाळेला वारंवार भेटी देत असतात. या शाळेला प्रशस्त प्रांगण असुन त्यामध्ये अमृतवाटीका, ऑक्सिजन पार्क, परसबाग, व्यायाम शाळा, प्रशस्त अशी विज्ञान प्रयोगशाळा,कॉम्पूटर लॅब ,वाचनालय, विद्यार्थी बचत बँक, 3535 आकाराचे भव्य रंगमंच व इAङA प्रकल्पांतर्गत ( र्इीळश्रवळपस Aी र ङशरीपळपस Aळवी) सम्पूर्ण शालेय इमारत स्वतः शिक्षकांनी कोरोना काळात आतून बाहेरून रंगवली आहे हे विशेष . सर्वांच्या सहा कार्याने व मेहनतीचे फळ म्हणून मागील वर्षीही या शाळेचा याच स्पर्धेत तालूक्यातून दुसरा क्रमांक प्राप्त केला होता . या शाळेला पाहून आपोआपच मनात गीत गुणगुणते ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जसा माऊली बाळातालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यानंतर दिनांक 13/9/2024 रोजी जिल्हा स्तरीय समितीनेही शाळेची पाहणी व मुल्यांकन केले आहे. जिल्हा स्तरावर शाळेला पहिला क्रमांक मिळावा अशी ही शाळा असल्याची प्रतिक्रीया गावकर्यांमधून उमटत आहेत.