ग्रामीण विकासासाठी मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत 05 कोटी निधी मंजूर माजी मंत्री खोतकर यांचा विकास कामाचा धडाका सुरूच!

8

जालना । प्रतिनिधी – शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचा विकास कामाचा धडाका सुरूच असून त्यांनी ग्रामीण भागासाठी स.न.2024-25 या आर्थिक वर्ष तरतुदीनुसार मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत (25 15, 1238 ) या योजने अंतर्गत जवळपास 03 कोटी रुपयाचा निधी ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या शासन निर्णय क्रं. विकास 2024 /प्र.क्र.214/ योजना 6, दिनांक 13 सप्टेंबर 2024 नुसार व मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजने अंतर्गतखालील गावांना ग्रामपंचायत इमारत बांधकामना मंजुरी मिळाली* यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला बांधकामासाठी 20 लक्ष प्रमाणे 01कोटी 70लक्ष रुपयांचा निधी मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मौजपुरी, बोरखेडी, इंदलकरवाडी, गवळीपोखरी, पाहेगाव, धावेडी, खरपुडी, कुंबेफळ सिदखेड, या ग्रामपंचायत चा समावेश आहे ही कामे जि. प. बांधकाम विभागा मार्फत होणार आहे.व उर्वरीत निधी अंतर्गत ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी सा.सभागृहाचे कामे मंजूर करण्यात आली असून ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत त्वरित हाती घेण्यात येतील व दर्जेदार केले जाणार आहेत , असे शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटलेले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये अर्जुनराव खोतकर यांनी जालना विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामाचा झपाटा लावलेला असून कोट्यावधी रुपयांची विकासकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेतलेला आहे .यामध्ये प्रामुख्याने , जिल्हा नियोजन समिती, नगर विकास विभाग ,ग्रामविकास विभाग, अल्पसंख्याक विभाग, रोहयो विभाग , सामाजिक न्याय विभाग आदी विभागातील कामाचा समावेश आहे. जालना विधानसभा मतदारसंघासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री दादा भुसे, पालकमंत्री अतुल सावे यांचे आभार व्यक्त केले.