श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे सभागृह बांधणार – आ. बबनराव लोणीकर

12

मंठा । प्रतिनिधी – वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा; राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करत असतो.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून मोठी संत परंपरा आपल्याला लाभली. संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचे अध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. कारण धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंगाचे नामस्मरण करताना चांगले विचार, चांगले कार्य करण्याचे विचार मनात येतात, दुष्ट विचार दूर जातात. मला काय मिळाले यापेक्षा दुसर्‍याला काय देणार हे महत्त्वाचे आहे. स्वत:साठी जगत असताना दुसर्‍याचे दु:ख वाटून घेण्याचे काम करणार्‍यांपैकी वारकरी संप्रदाय आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री पदापूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. ते श्री क्षेत्र ओंकारेश्वर संन्यास आश्रम पंचायती आनंद आखाडा देवगाव खवणे तालुका मंठा जिल्हा जालना येथे वार्षिक गणेश महोत्सव निमित्त अकरा गाव एक गणपती व अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील ह. भ. प. समाधान महाराज शर्मा केज यांच्या आयोजित हरी कीर्तनाला उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधताना बोलत होते.
पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे बारागाव एक गणपती हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळांना प्रेरणादायी ठरणार आहे. याच अनुषंगाने श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे एक कोटी रुपये किंमत असलेल सभागृह येत्या पुढील वर्षात आपण पूर्ण करणार असून त्याकरता विशेष निधीची तरतूद ही आपण करणार आहोत. या प्रसंगी मताधिपती गुरुवर्य परमश्रद्धेय श्री महंत भागवतगिरीजी महाराज श्री महंत बालकगिरीजी महाराज बाळासाहेब जाधव गणेशराव खवने राजेश मोरे नाथाराव काकडे विलास घोडके माऊली शेजूळ जिजाबाई जाधव विकास पालवे उदय बोराडे मनोज देशमुख यांच्या सह परिसरातील बारा ही गावातील हजारो महिला व पुरुषांची उपस्थिती होती.