जालना : जालना गणेश फेस्टीव्हलमध्ये यंदा बहारदार कार्यक्रम होत असून त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबई येथील ऑकेट्राने हिंदी- मराठी गाण्यांची चांगलीच मैफल रंगल्याचे दिसून आले. यावेळी फेस्टीव्हलचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील, अध्यक्ष राजेंद्र गोरे, विजय चौधरी, विष्णू पाचफुले, गोपाल गोयल, राजेश सोनी, बाला परदेशी, दिनेश फलके, राजेंद्र राख, सुभाष कोळकर, शरद देशमुख, डॉ. संजय राख, अशोकराव आगलावे, राजेश काळे, अशोक उबाळे, शंकर लुंगे, चंद्रशेखर वाळींबे, अजिंक्य घोगरे, प्रसाद वाडेकर, राहुल अग्रवाल, यांच्यासह माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे, भास्करराव दानवे, ए. जे. बोराडे, संयोजन समितीतील पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभीच गणेश वंदनेने सुरुवात झाली. त्यानंतर कल्पना पाटील यांनी गायिलेलं सोना रे सोना रेऽऽऽ हे गाणं उत्तमरित्या झालं. त्यानंतर सुत्र संचालनकर्त्याने सांगितले की, आपल्याकडे अनेक गितांची फर्माईश आलेली आहे. त्यात काही लोकगितांबरोबरच लावण्याचा समावेश असल्याचे सांगितले. त्यानंतर संतोषकुमार यांनी किशोर कुमार यांच्या आवाजातील कोई ना अजनबी…. हे गित गायीले. या ऑलकेस्ट्रामधील टिपने अख्ख सभागृह डोक्यावर घेतलं. त्यांच्या एका गायक कलाकाराने तर कमालच केली, त्यांनी चक्क प्रेक्षकांमध्ये जाऊन गित गायीले. त्यावेळी तरुण- तरुणींनी ठेका धरला. यानंतर संयोजन समितीच्यावतीने ऑकेट्रामधील कलावंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिर्डीवाले साईबाबाऽऽऽ या गाण्याने उपस्थितांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला. या कार्यक्रमास सुरेश मुळे, राजेश राऊत, अशोकराव पांगारकर, सिध्दी विनाययक मुळे, बद्रीनाथ पंठाडे, हरिहर शिंदे, भाऊसाहेब घुगे, सतीश एस. देशमुख, संदीप गायकवाड, प्रा.राजेंद्र भोसले, सुरेशराव मुळे, संजय देठे, बबनराव गाडेकर, दिपक नन्नवरे, शेख महेमूद, अकबर इनामदार, उदय देशमुख, ज्ञानेश्वर डुकरे आदींसह परिसरातील महिला- पुरुष, तरुण, तरुणींची लक्षणीय उपस्थिती होती.
चौकट……
गणपतीच्या सर्वांना शुभेच्छा-रावसाहेब दानवे
यावेळी शुभेच्छापर बोलतांना माजी केेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे म्हणाले की,गणपतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा! मी या गणेश फेस्टीव्हलला दरवर्षीच भेट देत असतो. गेल्या काही वर्षापासून सर्वच राजकीय पक्ष आणि पदाधिकार्यांच्या पुढाकाराने हा फेस्टीव्हल सुरु आहे. परंतू गतवषीर्र् कोरोनामुळे हा फेस्टीव्हल झाला नव्हता. त्यामुळे अनेकांना चुकल्यासारखे वाटत होते. कारण ज्याची सवय झाली ती काही केल्या सुटत नाही. म्हणूनच फेस्टीव्हलला नसल्याचं दु:ख अनेकांनी ते नको असतांनाही पचवलं असल्याचे सांगून श्री. दानवे म्हणाले की, मी या फेस्टीव्हलच्या उद्घाटनालाच येणार होतो. परंतू त्या दिवशीच मुंबईला अमित शहांची बैठक होती. मीही त्या बैठकीला गेलो होतो, असेही श्री. दानवे यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन किरण गरड यांनी केले.
आज मराठी संस्कृतीचा आणि लोककलेचा पारंपारीक नृत्याविष्कार कार्यक्रम
उद्या दि. 14 सप्टेंबर रोजी सायंंकाळी 6 वाजता स्व. कल्याणराव घोगरे स्टेडियममध्ये महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचा आणि लोककलेचा पारंपारीक नृत्याविष्कार श्लोक निर्मीत अशी आमची माय मराठी हा मनोज माझीरे निर्मित आणि याचे सुत्रधार आहेत स्वप्नील कांडेकर! या कार्यक्रमाचा जालनेकरांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन फेस्टीव्हलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे आणि संयोजन समितीने केले आहे.