जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट

106

जालना –  जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर विकसित करण्यात येत असलेल्या विविध क्रीडा संकुलाच्या कामांना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी अचानक भेट देत पाहणी केली. कामांच्या पाहणी दरम्यान कंत्राटदार, वास्तुविशारद तसेच संबंधित अधिकाऱ्यांना प्रगतीवर असलेली व अंतिम टप्प्यातील कामे दर्जेदारपणे करण्याच्या सुचना दिल्या.

जिल्हा क्रीडा संकुलावर टप्पा क्र.1 अंतर्गत टेनिस कोर्ट 2, सिंथेटीक बास्केटबॉल 1, आर्टिफिशियल क्रिकेट टर्फ 1, सिंथेटीक स्केटींग रिंग 1, व्हॉलीबॉल मैदान 2, कबड्डी मैदान 2, खोखो मैदान 2, जिम हॉल 1, संरक्षक भिंत तसेच अंतर्गत रस्ते व ड्रेनेज लाईन आदि कामे जिल्हा क्रीडा संकुल समितीकडून विकसित करण्यात येत आहेत. टप्पा 2 अंतर्गत 400 मिटर सिंथेटीक ट्रॅक व नॅचरल फुटबॉल मैदानाचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणीही जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, कंत्राटदार, वास्तुविशारद धीरज शर्मा, क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे, क्रीडा मार्गदर्शक सिध्दार्थ कदम, आशिष जोगदंड, संतोष वाबळे यांची उपस्थिती होती.