प्रदूषण नियंत्रण विभाग व नगरपालिकेने शहरातून केले 336 कीलो प्लास्टिक जप्त

102

जालना । राज्य सरकारने बंदी घातलेल्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देणाऱ्या विक्रेत्यांविरोधात आज मंगळवारी(दि. 18) रोजी प्रदुषण नियंत्रण विभाग आणि नगर पालिकाकडून कारवाई करत तब्बल 336 किलो प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिक जप्त केले आहे.

शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य सरकारने बंदी घातलेल्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या तसेच प्लास्टिकचे ईतर साहित्य ग्राहकांना देणाऱ्या जूना मोंढा व नविन मोंढा भागातील विक्रेत्यांविरोधात पालिकेने व प्रदूषण नियंत्रण विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एकूण 336 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून या विक्रेत्यांकडून पंधरा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई प्रदूषण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नगरपालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार स्वच्छता निरिक्षक लोंढे, गावंडे, गजबे, पाचगे, चांदोडे, शोएब खान, अरुण वानखेडे, राधेशाम लोखंडे, रविंन्द्र कल्याणी सहीत कर्मचाऱ्यांच्या वतीने कारवाई करण्यात आली.