वरुड बुद्रुकच्या न्यू हायस्कूलच्या 75 विद्यार्थ्यांनी मिळवली 3,25,000 रुपयांची श्रीराम फायनान्स शिष्यवृत्ती

18

जाफराबाद । प्रतिनिधी – वरुड बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील न्यू हायस्कूल वरुड बुद्रुक शाळेस श्रीराम फायनान्स तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाहन चालकांच्या पाल्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीचे स्वरूप वर्ग आठवी ते दहावी साठी 4,000 रुपये तर वर्ग अकरावी ते बारावी साठी 5000 रुपये असे असून विद्यार्थ्यांना बारावी शिक्षण पूर्ण होईपर्यंत ही शिष्यवृत्ती वार्षिक पद्धतीने प्रदान केली जाते.
2024-25 या शैक्षणिक वर्षात न्यू हायस्कूल वरुड घायवट या शाळेतील 75 गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण तीन लाख 25 हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या खात्यात करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून भागणार असल्याने त्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीराम फायनान्स तर्फे आयोजित शिष्यवृत्ती मध्ये जालना जिल्ह्यातून सर्वात जास्त शिष्यवृत्तीचा लाभ घेणारी शाळा म्हणून न्यू हायस्कूल, वरुड घायवट या शाळेचे नाव घेतलं जाते. यासाठी श्रीराम फायनान्स चे सर्व अधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने श्रीराम फायनान्स सिल्लोड ब्रांचे मॅनेजर सन्माननीय स्वप्निल मालवे, छत्रपती संभाजीनगरचे ब्रांच मॅनेजर शिवाजी सुखाचे तसेच वसुली अधिकारी श्री अण्णा मिरगे आणि राम कड यांचे रजिस्ट्रेशन पासून ते विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्कॉलरशिप जमा होईपर्यंत मोलाचे मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभले.
न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या या शिष्यवृत्तीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय बल्लाळ आणि शिष्यवृत्ती विभाग प्रमुख अनिल भोपळे,, एकनाथ शेवत्रे, तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी श्रीराम फायनान्स कंपनीचे आभार व्यक्त केले.