गुरुदेव इंग्लिश पब्लिक स्कूल व भालचंद्र देसले सेमी इंग्रजी हायस्कूल मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन

4

गुरुदेव इंग्लिश पब्लिक स्कूल व भालचंद्र देसले सेमी इंग्रजी हायस्कूल मध्ये गणेशोस्तव निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये चित्रकला स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री गजानन गोरे सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांनी अभ्यासासोबत स्पर्धा कशाची करावी ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबात स्पर्धेचे ज्ञान मिळेल या विषयी विद्यार्थ्यांना आवाहन केले. स्पर्धेचे नियोजन श्री एस एस कुलकर्णी सर व संभाजी मोरे सर, श्री शेख सर यांनी केले, परीक्षण श्रीमती अनिता मॅडम व श्री प्रितम मोरे सर, श्री गणेश भानुसे सर, श्री राजपूत सर यांनी केले.
विजेत्या स्पर्धकांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिनिधीशी बोलताना मुख्याध्यापक श्री गजानन गोरे सर यांनी दिली.