माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी केली नाट्यगृह इमारत, मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह इमारतीच्या कामाची केली पाहणी मागासवर्गीय मुलींच्या उच्च सुविधा असलेल्या इमारतीच्या माध्यमातून लवकरच विद्यार्थिनींना मिळणार निवासाची उत्तम सुविधा

27

जालना । प्रतिनिधी – माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी परतुर शहरांमध्ये साकारत असलेल्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या नाट्यगृह इमारती च्या अंतिम टप्प्यात आलेल्या कामाची तसेच उच्च सुविधांनी युक्त असे मागासवर्गीय मुलींच्या वस्तीत ग्रहाच्या कामाची पाहणी केली. तर परतूर शहरातील नागरिकांना पालिका इमारतीच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी 06 कोटी रुपये किमतीच्या नवीन इमारतीच्या जागेची पाहणी करून लवकरच नाट्यगृह मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह यांचे लोकार्पण तर नगरपालिका इमारतीचे भूमिपूजन होणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
यावेळी वार्तालाप करताना ते म्हणाले की, परतूर शहरासह ग्रामीण भागातील सांस्कृतिक कार्यक्रम विविध धार्मिक किर्तन सोहळे, पथनाट्य नाटक, लोककलांसाठी वातानुकूलित 900 असन क्षमता असलेले नाट्यगृह आता अंतिम टप्प्यात आलेले आहे तर दर्जेदार सुविधांनी युक्त असे आंबा का परतुर येथील मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह ही अंतिम टप्प्यात आहे या वस्तीगृहाच्या माध्यमातून मागासवर्गीय मुलींना निवार्याची उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून या पुढील आठवड्यात लोकार्पण केले जाणार आहे तर परतूर शहरातील नागरिकांना आपल्या प्रशासकीय कामासाठी उत्तम व दर्जेदार अशी मध्यवस्तीत असलेल्या नगरपालिका इमारत बांधकामाचे भूमिपूजन ही याच दरम्यान केले जाणार असल्याची माहिती आमदार लोणीकर यांनी यावेळी बोलताना दिली.
अंतिम टप्प्यात असलेल्या नाट्यगृह व वस्तीग्रह इमारत कामाच्या पाहणी दौर्‍या दरम्यान त्यांनी दोन्ही कामाची प्रगती पाहून समाधान व्यक्त करीत अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना दिल्या
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बंसल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मिठेवाड, गटविकास अधिकारी भाजपा ता अध्यक्ष शत्रुघ्न कणसे, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण सतोनकर, नगरसेवक संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे, ओम प्रकाश मोरे पंचायत समिती सदस्य शिवाजी पाईकराव, बंडू मानवतकर, नरेश कांबळे, विजय यादव, मलिक कुरेशी मुज्जू कायमखानी, अमोल अग्रवाल, मेराज खतीब प्रशांत बोनगे कृष्णा भदर्गे रामजी कोरडे जीवन रेंगले, गोपाल गोरे, शेख अथर, परतुर पोलीस निरीक्षक सुरवसे, गटविकास अधिकारी श्री तांगडे यांच्यासह कामाशी संबंधित सर्व अधिकारी नागरिकांची उपस्थिती होती.