जालना । प्रतिनिधी – जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे यांना मुस्लिम समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नसून वक्फ बोर्डाबाबत काळे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. असं म्हणत रजा अकादमीचे सय्यद जमील मौलाना यांनी काळे यांच्यावर टीका केली. ते मुस्लिम समाजाच्या बाजून उभे राहतील असं वाटत नसून निवडणुकीच्या काळात ते मुस्लिम समाजाबद्दल बोलत होते. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी एकाही मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली नाहीये. कोणत्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला भेटलेले नाहीत.
त्याचबरोबर त्यांनी अद्याप वक्फ बोर्डाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
मुस्लिम समाजाला नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून काय अपेक्षा आहेत या प्रश्नावर बोलताना सय्यद जमील मौलाना म्हणाले की, खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून मुस्लिम समाजाला कोणतीही अपेक्षा नाही कारण निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने कल्याण काळे हे मुस्लिम समाजाला भेटत होते ते आता निवडणुकीनंतर निवडून आल्यावर कोणाही मुस्लीम संस्थेशी किंवा प्रतिष्ठित नागरिकांची त्यांनी भेट घेतली नाही. त्यामुळे येणार्या काळामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नसून पाच वर्ष आम्हाला असेच सहन करावे लागणार
त्यामुळं त्यांच्याकडून आता आशा राहिली नसून 2029 लाच आम्हाला जालन्याचा खासदार मिळेल असं म्हणत सय्यद जमील मौलाना यांनी काळे यांच्यावर टीका केली.