मंठा । प्रतिनिधी – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात वातावरण निर्मितीस सुरुवात झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.विविध राजकीय पक्षांतील राजकीय पदाधिकार्यांची पसंती शिंदेंच्या शिवसेनेला मिळताना दिसत आहे. आठवड्यातील तिसरी इंनकमिंग तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन बुधवार ( दि.11 रोजी) शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडली.
नायगाव येथील माजी सरपंच प्रल्हाद सांगळेयांच्या नेतृत्वात माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप राठोड,संपत आढे,शंकर राठोड,नारायण राठोड,महेश राठोड,समाधान राठोड, गणेश राठोड, रामेश्वर राठोड,विनोद राठोड,गणेश घुगे,गजानन राठोड,सुनील राठोड,भगवान राठोड,तुकाराम फुफाटे, यांनीश्र जाहीर प्रवेश घेतला.
यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख योगेश गणगे, शिवसेना उप तालुकाप्रमुख विलास राठोड,शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग बोराडे, चांद भाई पठाण, युवा सेना तालुकाप्रमुख दीपक गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय बोराडे, युवा सेना उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, युवा सेना उपतालुकाप्रमुख लिंबाजी बोराडे, खोराड सावंगी सर्कल प्रमुख माऊली वायाळ,सुनील गुंड,सहिद रहीम व इतर पदाधिार्यांची उपस्थीती होती.