जालना । प्रतिनिधी – तालुक्यातील मौजपुरी येथील अजिंक्य सत्यनारायण ढोकळे या विद्यार्थ्याने तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या 41 वजन गटात 14 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय. त्याची आता पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने नुकत्याच शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. दरम्यान या स्पर्धेत मौजपुरी येथील अजिंक्य सत्यनारायण ढोकळे या विद्यार्थ्याने रंगतदार कुस्ती करीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कुस्तीचा डाव खेळेत अजिंक्य ढोकळे याने प्रतिस्पर्धकाला चितपट करीत कुस्ती जिंकली. तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत अजिंक्य ढोकळे याने प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळविला आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सरपंच बद्रीणारायण भसांडे, सत्यनारायण ढोकळे, बालाजी बळप, अंकुश काळे, अच्युत मोरे, कृष्णा हिवाळे यांच्या सह गावकर्यांनी अभिनंनद केले.