विकास कामांचे भास्कर दानवे यांच्या हस्ते उदघाटन

15

जालना । प्रतिनिधी – जालना शहरातील शिवाजीनगर येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिर, म्हाडा कॉलनी येथे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन सोहळा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांच्या हस्ते पार पडला. मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत यावेळी झालेल्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.
तसेच यावेळी बोलताना भास्करआबा दानवे यांनी,मंदिरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, लग्न होत असतात म्हणून या ठिकाणी स्वयंपाकासाठी शेड आणि 2 रूम ची आवश्यकता होती तेव्हा मा रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून मंदिरासाठी दोन रुम व किचन शेडचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे याचे आज भूमिपूजन करण्यात येत आहे आणि लवकरच हे काम देखील पूर्ण होईल असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष वसंतराव शिंदे, कपिलजी दहेकर, बाबुराव आंबेकर, जुगलशेठ भूक्कड, बबनराव जाधव, दत्ता जाधव, ज्ञानेश्वर मानवतकर, गणेश आढाव, विष्णू सांगोळे, गणेश जीरेकर, दीपक शिंदे, पुंडलिकराव गाडेकर, विलास पवार, रावसाहेब काकडे, हिवाळे साहेब, शिवाजीराव खरात, पंडित सर, प्रसाद काकडे, विनायकराव जगताप, हजारे सर, नारायण काकडे, महामुनी, सूरा सर, गणेश आंबेकर , योगेश नागरे, राजकुमार कुमावत, संजय सावजी, सत्तूशेठ काबरा, अमोल निंबळकर, बळीराम पवार, हुडसे सर, अर्जुन इंगळे, भाऊसाहेब कोलते, लोंढे साहेब, गोवर्धनजाधव, ज्ञानेश्वर सुसर, रामेश्वर आंबेकर, प्रदीप मिसाळ, गणेश साबळे, शिवाजीराव साळुंके, डिगोले सर ,प्रदीप देशमुख व कॉलनीतील व प्रभागातील अनेक रहिवासी नागरिक उपस्थित होते.