ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यावा – आमदार लोणीकर, प्रवास खर्चासाठी प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये राज्य सरकार देणार

22

जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्याचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषित केले आहे. परतूर विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील मोठ्या तीर्थ यात्रांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार राज्यातील व भारत देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून, सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे, तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार असावे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्षे साठवरील ज्येष्ठ नागरिक असावा. अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या कार्यालयातून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे की सदर योजनेचा लाभ मिळविण्या साठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत. सदर योजनेअंतर्गत विविध दळणव- ळणाच्या साधनांद्वारे प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच खठउढउ किंवा समकक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत कंपन्यांची निवड विहित नियमांचे निविदा प्रक्रियेचे पालन करुन करण्यात येणार आहे. प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जाच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे. 75 वर्षांवरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल.