जालना । प्रतिनिधी -मानवी आरोग्यास घातक असलेले व एनडीपीसी घटक प्रतिबंधीत असलेले गुंगीकारक औषधी व टॅबलेट (गोळ्या) चा मोठा साठा पोलीसांनी नुकताच जप्त केला होता. यात जालन्यातील दोन मेडीकल चालकांसह अकोल्यातील एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले होते त्यानंतर आता अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू यास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केली.
जालना शहरात नशेच्या गोळ्या विकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या बटन गोळ्याची विक्री करणार्या दोन मेडिकल चालकाविरोधात जालना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सात सप्टेंबर रोजी कारवाई केली होती. त्यानंतर याच प्रकरणात आता पोलिसांनी अमरावती येथील औषधी पुरवठादार कपिल साहू यांना देखील अटक केली आहे. अमरावती येथून जालना शहरात अवैध गर्भपात करण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या, नशेच्या गोळ्या तसेच सेक्स वाढवण्याच्या गोळ्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार या तपासात समोर आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी संतोष बाळासाहेब जाधव, दर्शन मेडिकल जालना, राहुल भागाजी गायकवाड विराज मेडिकल जालना आणि उद्धव शिवाजी पठारे तसेच सागर आठवले अकोला यांना ताब्यात घेतलं होते. त्यानंतर पोलिसांनी आता अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू याला देखील ताब्यात घेतल आहे.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी 8 लाख 18 हजार 400 रुपयांचा औषधी साठा जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागिय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, रुस्तुम जैवळ, कैलास खर्डे, हजारे, भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, महिला पोलीस नाईक चंद्रकला शडमल्लू, संदीप चिंचोले, किशोर पुंगळे, सचिन राऊत,योगेश सहाने, गणपत पवार, रमेश पैठणे आदींनी केली.