शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे ऑनलाईन उदघाटन  

11

 

जालना, दि. 10 (जिमाका) :- देशाचे महामहिम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने रविवार दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता संविधान‍ मंदिराचे उदघाटनाचे चंदनझिरा येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. तरी सर्व विद्यालयीन- महाविद्यालयीन विद्यार्थी व शहरातील नागरिकांनी या उदघाटनपर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

            संविधान‍ मंदिर उदघाटन कार्यक्रमास शहरातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. उदघाटनपर कार्यक्रम जालना येथील चंदनझिरा परिसरातील एसटी कार्यशाळेच्या बाजूस असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा, कायदेविषयक मार्गदर्शन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असेही सहा.प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.