आष्टी । प्रतिनिधी – आमदार बबनराव लोणीकर यांनी राजकारणाचा समाजासाठी उपयोग करून खर्या अर्थाने धर्म रक्षणाचे काम केले असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्वर 1008 स्वामी मनीषानंद जी महाराज पुरी यांनी केले,
ते आष्टी ता परतूर येथे ग्रामदैवत खंडेश्वर मंदिर येथे पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून त03 कोटी 54 लक्ष रुपये किमतीच्या कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की, धार्मिक अधिष्ठानाच्या माध्यमातून आचरणात शुद्धी येते ही शुद्धी येण्यासाठी आमदार लोणीकरांनी भाविक भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल लोणीकरांचे कौतुक केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, धार्मिक व समाज उपयोगी विकास कामे करणार्या माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना आपण पाठबळ देऊन यापुढेही त्यांच्या हातून असेच कार्य घडावे यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले
यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी, साधू संतांच्या आशीर्वादामुळेच आपण मतदारसंघातील 300 गावांमध्ये सभामंडपाचे काम करू शकलो गावाला रस्त्याने जोडू शकलो, विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य दिन दलित पीडितांना मदत करू शकलो असे सांगितले
पुढे आमदार लोणीकर म्हणाले की, नांगरतास येथील भव्य दिव्य सभागृह असेल तेथील भक्तांच्या सोयी सुविधा असतील यासाठी आपण 02 कोटी रुपये निधी खेचून आणत या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे सांगतानाच, काराळा करळेश्वर मंदिर असेल, दैठणा येथील गुरु गंगाभारती महाराज संस्थान असेल आष्टी येथील शेख बाबू दर्गा असेल, गणपती मंदिर असेल सिद्धेश्वर मंदिरा असेल, काळा मारुती मंदिर असेल अशा प्रकारची अनेक विकास कामे आपण विविध धार्मिक स्थळी केली असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
आष्टी व परिसरासाठी गेल्या पाच सात वर्षात 300 कोटी रुपयांच्या निधीची विकास कामे झाली असून आष्टी शहरांमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये गुडघाभर चिखल असायचा मात्र आपण मंत्री झाल्यानंतर आष्टी शहरातील प्रत्येक रस्ता बांधून या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिले असल्याचे आमदार लोणीकर म्हणाले. पशुवैद्यकीय दवाखाने असतील ग्रामीण रुग्णालय असेल आरोग्य केंद्र असतील, इत्यादी मूलभूत सुविधा आपण सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देऊ शकलो याचा आनंद असून आपल्या सर्वांच्या प्रेमानेच हे सगळे होऊ शकले असे यावेळी त्यांनी सांगितले
भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी मी आमदार लोणीकर यांच्याकडे ज्या ज्या मागण्या विकास कामाबाबतीत केल्या त्या सर्व मागणी आमदार लोणीकरांनी पूर्ण केले असल्याचे सांगतानाच खर्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला, विकास आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचे काम आमदार लोणीकर यांनी केले असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले
कार्यक्रमाचे संचालन तुकाराम सोळंके यांनी केले. यावेळी भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्यासह, भीम महाराज गणेश महाराज, गोपाळ महाराज जोशी, भाजपा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, जिल्हा सरचिटणीस रमेश भापकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपत टकले तुकाअबा सोळंके जिल्हा परिषद सदस्य सुदाम प्रधान पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रवींद्र सोळंके माणिकराव वाघमारे प्रदीप ढवळे व्यापारी महासंघाचे कृष्णा टेकाळे, खंडेराव पाटील, बाबाराव थोरात सरपंच शोभा चंद्रकांत मोरे जीवनराव येवले अशोकराव वाघमारे माणिकराव वाघमारे माऊली सोळंके,उपसरपंच नसरुल्ला काकड, उद्धवराव गुंजाळ, अमोल जोशी मधुकर मोरे रमेश थोरात श्रीधर गांजाळे गजानन लोणीकर सिद्धेश्वर केकान नंदकुमार गांजे बंडू मानवतकर बळीराम थोरात बाबा सोळंके, रमेश राठोड रावसाहेब आढें उमेश सोळंके,अल्ताफ कुरेशी सईद शेख, मारुती थोरात बबलू सातपुते रफिक राज असिफ कच्ची, सिताराम राठोड , किरण अंभोरे परमेश्वर केकान नागेश ढवळे अमोल पवार राजेंद्र बाहीती विष्णू शहाणे, सुमंत पाटील
तहसीलदार प्रतिभा गोरे गटविकास अधिकारी श्री राजेश तांगडे, अभियंता श्री सगरोळे ग्रामसेवक डी बी काळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक माता भगिनींची उपस्थिती होती