जालना । प्रतिनिधी – शहरातील बडी सडक च्या नावाने प्रसिद्ध असलेल्या बडी सडक चा राजा गणेश मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही देखाव्याचा खर्च टाळून शुक्रवार ( ता. 13) पासून सलग चार दिवस भाविकांना प्रसाद वितरित केला जाणार आहे.
बडी सडक चा राजाचे यंदा 16 वे वर्ष आहे. गणपती बाप्पांची आकर्षक मूर्ती बसविण्यात आली असून शुक्रवारी ( ता. 13) सायंकाळी चने, मटकी, वटाणे मिक्स मसाला भेळ, शनिवारी ( ता. 14) एकादशीनिमित्त रोज मिल्क शेक, रविवारी ( ता. 15) चायनीज भेळ, सोमवारी ( ता. 16) पावभाजी वाटप केली जाईल. दररोज पाच ते सात हजार भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे सदस्य संदीप गिंदोडिया, आदित्य बगडिया, निलेश भारूका, राहुल अग्रवाल, भूषण तवरावाला, सचिन चौधरी, निखिल जैस्वाल, प्रितेश मालपाणी, रघु भक्कड, रुपेश बगडिया, वेनूगोपाल डागा, दिपक पहाडे, संदेश लव्हाडे, विशाल कामड, अजय बगडिया, चेतन चोरडिया, भूषण देवीदान, डॉ. प्रतिक लाहोटी, रोहित गौड, कपिल गोरांत्याल, जितेश तलरेजा, अमित ठक्कर, अनिल चावला, जिगर शाह, चेतन अग्रवाल यांच्यासह मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.