लॉयन्स क्लबतर्फे महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार; महिलेला पिको-फॉल मशीन प्रदान करून उपलब्ध करून दिला स्वयंरोजगार

20

जालना । प्रतिनिधी – लॉयन्स क्लब जालनातर्फे महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत सुकन्या कुंडलकर यांना सोमवार दि. 9 सप्टेंबर रोजी साडीला पीको आणि फॉल करण्याची मशीन प्रदान करण्यात येऊन स्वयंरोजगाराचा मार्ग सुकर करून देण्यात आला. हा उपक्रम माजी प्रांतपाल आणि लायन्स परिवाराचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम जयपुरीया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आला.
सुकन्या कुंडलकर या सुशिक्षित महिलेने रोजगाराच्यादृष्टीने साडीला पिको-फॉल करण्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. मात्र, मशीन नसल्यामुळे तिचा रोजगाराचा मार्ग अडखळला होता. ही बाब विचारात घेऊन, साडी पिको, फॉल करण्याची मशीन प्रदान करण्यात आली. या मशीनमुळे तिचे आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल पुढे पडले आहे.
मशीन प्रदान सोहळ्याप्रसंगी लॉयन्स क्लबच्या अध्यक्ष जयश्री लढ्ढा, सचिव मंजू श्रीमाली यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल पुरुषोत्तम जयपुरीया यांचे स्वागत केले. याप्रसंगी बळीराम बेन्द्रे, वंदना मुदंडा, अरुण मित्तल, द्वारकादास मुदंडा, राजेश खीस्ते, प्रकाश कुंडलकर, जयप्रकाश श्रीमाली, अतुल लढ्ढा, तसेच लायन्स क्लब जालना रॉयल्सच्या पद्मा लढ्ढा उपस्थित होत्या. या उपक्रमाच्या माध्यमातून लायन्स क्लबने महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.