बाजारपेठेत पोलीसांनी दिड लाखांचा गुटखा पकडला; कारसह आठ लाखाचा मुद्देमाल जप्त;

29

जालना । प्रतिनिधी – शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात रविवार (दि 8) मध्यरात्री पोलीसांनी सुमारे दिड लाख रू. किंमतीचा गुटखा व एका कारसह आठ लाख रुपयांचा मुद्देमाज जप्त केला आहे. ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.  रविवार (दि 8) रात्री एका महागड्या कारमध्ये अवैध मार्गाने शहरात गुटखा येणार असल्याची गुप्त माहिती सदर बाजार पोलीसांना मिळाली होती. त्यावरून पोलीसांनी सापळा रचून कारवर कारवाई केली असता, त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याचे निष्पन्न झाले. कार क्रं. चक 21 इत 3213 सह पोलीसांनी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अन्न व औषधी विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून सोमवार (दि.9) रोजी दुपारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदिप भारती यांच्या पथकाने केली आहे.