वंचित घटकांना दिवाळीचा गोडवा द्यावा: प्रांतपाल लॉ. जयपुरिया

37

जालना । समाजातील दुर्बल, उपेक्षित,वंचित घटकांना आपल्या सेवा कार्यातून पवित्र दीपावली सणाचा गोडवा द्यावा असे आवाहन प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांनी येथे बोलताना केले.

लॉयन्स क्लब प्रांत थ्री. टू. थ्री. फोर. एच. टू. च्या प्रांत पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक मधुर बँक्वेट हॉल येथे प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी प्रांत प्रशासकीय प्रमुख, अग्रविभूषण लॉ. सुभाषचंद्र देवीदान,उप प्रांतपाल लॉ. सुनील देसरडा, लॉ. गिरीश शिसोदिया, मल्टीपल काऊंसिल चेअरपर्सन लॉ. दिलीप मोदी, सचिव लॉ. अरूण मित्तल, कोषाध्यक्ष लॉ. राजेश कामड,जी. एल. टी. समन्वयक लॉ. अतुल लढ्ढा, लॉ. सुशील पांडे,प्रभाग अध्यक्षा लॉ. सौ. मिनाक्षी दाड, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांनी साडेतीन महिन्याच्या कालावधीत प्रांतात समाविष्ट अठरा जिल्ह्यांत शासकीय रुग्णालये, रेल्वे, बसस्थानक, येथे वॉटर प्युरिफायर ,फेरीवाले,छोट्या व्यावसायिकांना छञी,महिलांना शिलाई मशीन, वॉकर ,व्हीलचेअर,असे उपयोगी साहित्य वाटप, हर घर तिरंगा मोहीमेत सक्रिय सहभाग राहिला असून नेञ तपासणी , चिकीत्सा, रूग्णालयात भोजन ,स्थायी प्रकल्प सुरू असल्याचे नमूद करत आगामी दीपावली सणानिमित्त प्रांतातील प्रत्येक क्लब ने आपल्या स्तरावर तळागाळातील गरजवंतांना मदत करून सेवा कार्याची ज्योत अखंड तेवत ठेवा. असे आवाहन लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांनी केले. या वेळी आगामी काळात विविध सेवा प्रकल्प, सामुहिक विवाह, अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविकात अग्रविभूषण लॉ. सुभाषचंद्र देवीदान यांनी बैठकीचा हेतू विषद केला. लॉ. दिलीप मोदी, लॉ. सुनील देसरडा,लॉ. गिरीश सिसोदिया यांनी मनोगत व्यक्त केले.उपस्थित सदस्यांनी आजपर्यंत च्या सेवा कार्याचे विवरण सादर केले. प्रांत सचिव लॉ. अरूण मित्तल यांनी आभार मानले. राष्ट्रगीत आणि रंगारंग संगीत रजनीने समारोप झाला. या वेळी विभागीय, प्रभाग अध्यक्षांसह 14 जिल्ह्यांतील 120 पदाधिकारी उपस्थित होते.

उत्कृष्ट प्रांत म्हणून विशेष पुरस्कार

प्रारंभी दोन महिन्याच्या कार्यकाळात प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांच्या नेतृत्वाखाली प्रांतात नवीन सदस्य जोडणे, विभिन्न सेवा प्रकल्पांद्वारे जास्तीत जास्त गरजवंतांना लाभ मिळून देत समाजोपयोगी सेवा प्रकल्पांची निर्मीती, नवीन नेतृत्व विकसित करणे, अशा चौफेर कार्याची अंतरराष्ट्रीय अध्यक्षांनी दखल घेत त्यांनी पाठविलेला विशेष पुरस्कार मल्टीपल काऊंसिल चेअरपर्सन लॉ. दिलीप मोदी यांच्या हस्ते प्रांतपाल लॉ .पुरूषोत्तम जयपुरिया यांना प्रदान करण्यात आला