सतीश घाटगे यांच्या संकल्पनेतून वडीगोद्रीत साकारतेय भव्य बाजारपेठ; ४० वर्षापासून रखडलेल्या अंबडच्या मुख्य बाजार समितीच्या विकासाचा प्रश्न मार्गी

6

अंबड : भाजपा नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या प्रयत्नामुळे ४० वर्षापासून रखडलेल्या वडीगोद्री येथील मुख्य बाजार समितीच्या विकासाचा प्रश्न मार्गी  लागलाआहे. सतीश घाटगे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या विकासासाठी ६१ एकरावर भव्य मार्केट यार्ड विकसित होत आहे. या मार्केट यार्डमधील गाळ्यांचे वाटप शेतकरी व व्यापाऱ्यांना करण्यात येणार आहे.  त्यासाठी गाळ्यांचा जाहीर लिलाव होणार असून इच्छुक शेतकरी व व्यापाऱ्यांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन सतीश घाटगे यांनी केले आहे.

४० वर्षांपासून वडीगोद्री येथील मुख्य बाजार समितीच्या विकासाचा प्रश्न प्रलंबित होता.चाळीस वर्षांत राष्ट्रवादीच्या नेत्यांना या बाजार समितीचा प्रश्न सोडवता आला नाही.शेवटी बाजार समितीत सत्ता बदल होताच सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे सभापती अवधूत खडके,उपसभापती अरुण घुगे व महायुतीचे पदाधिकारी यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून बाजार समितीच्या विकासाचा प्रश्न सोडवला. त्यानंतर  शेतकरी व व्यापारी वर्गाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव आपल्या तालुक्यातच मिळावा याउद्देशाने  वडीगोद्री येथे ६१ एकरावर भव्य कृषी उद्योग प्रकल्प साकार होत आहे.शेतकरी व व्यापाऱ्यांना या प्रकल्पातील व्यापारी गाळे पारदर्शी पद्धतीने जाहीर लिलावातून व्यवसायासाठी देण्यात येणार आहे.त्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असून १५ सप्टेंबर पर्यंत इच्छुक शेतकरी व व्यापारी अर्ज करू शकतात.व्यवसायाच्या दृष्टीने ही संधी शेतकरी व व्यापारी वर्गासाठी महत्वाची असल्याने या लिलावात इच्छुक शेतकरी व व्यापारी यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन सतीश घाटगे यांनी केले आहे.

बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार
चाळीस वर्षापासून वडीगोद्रीत मुख्य बाजारपेठ सुरु होण्याची वाट शेतकरी पाहत होते.शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास टाकून  बाजार समितीची सत्ता भाजप -सेनेच्या  हातात दिली.सत्त्तेवर आल्यावर पहिला प्रयत्न शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा असून ६१ एकरावर भव्य कृषी उद्योग प्रकल्प शेतकरी आणि व्यापाऱ्यासाठी खुला होणार आहे.या प्रकल्पातील गाळे हे पारदर्शी पद्धतीने वाटप होणार आहे.