जालना (प्रतिनीधी) गणेशोत्सव हा सण सर्व समाज बांधवांना एकत्रित करणारा सण असून अशा उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता वाढीस मोठी मदत होते असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी येथे बोलतांना केले.
जालना शहरातील मामा चौकात साहनी कॉम्प्लेक्स मध्ये श्री जालना गणेश महासंघाच्या कार्यालयाचा शुभारंभ काल शनिवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास आ.कैलास गोरंटयाल, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर, रिपाई नेते ब्रम्हानंद चव्हाण, भास्करराव दानवे, जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे, राजेंद्र राख, राजेश राऊत, डेव्हीड घूमारे, राजेंद्र वाघमारे, सुभाषराव वाघमारे, बाला परदेशी, पारस नंद, महेश धन्नावत, सुनील खरे, शिवराज जाधव आदींची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना दानवे पाटील म्हणाले की, सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव काळात सामाजिक उपक्रम राबवून एक चांगला संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा. उत्सवाच्या निमित्ताने नाचणे , गाणे हा छंद जोपासला जात असला तरी काळाची गरज लक्षात घेऊन सामाजिक उपक्रम राबविण्यावर देखील लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून जालना गणेश महासंघातर्फे राबविण्यात येत असलेला संविधान उद्देशिका वाचनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे दानवे पाटील म्हणाले. या कार्यक्रमात जालना गणेश फेस्टिवलच्या अध्यक्षपदी राजेंद्र गोरे यांची निवड झाल्याबद्दल जालना गणेश महासंघाच्या वतीने त्यांचा आणि राजेंद्र राख यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करतांना कार्यक्रमाची रूपरेषा आणि भूमिका विषद केली. गणेश महासंघातर्फे जालना शहरात गणेशोत्सवाच्या काळात संविधान उद्देशीका वाचनाचा उपक्रम राबविण्यात येणार असून ४०० गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचून संविधान उद्देशिकेचे वावन करण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे स्पष्ट करून जालना गणेश महासंघातर्फे महीला, युवक, युवती यांच्यासाठी गणपती अथर्व शीर्ष पठण, रांगोळी स्पर्धा, सायकल स्पर्धा, भव्य कुस्ती स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून शहरातील गणेश मंडळातील निर्माल्य दररोज संकलित करण्यासाठी जालना गणेश महासंघातर्फे स्वतंत्र ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले असून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या सुविधेचा वापर करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थीत प्रमुख मान्यवरांचे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ व वृक्षाचे रोपटे देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगतकुमार घुगे यांनी तर शेवटी आभार महेश धन्नावत यांनी मानले. कार्यक्रमास अर्जुन गेही, विश्वनाथ क्षीरसागर, संजय आटोळे, महेंद्र देशपांडे, तुकाराम मिसाळ, अशोकराव मिसाळ, राजेश बाबरेकर, अविनाश भंडे, कैलास लोया, वासुदेव देवडे, शाम लोया, विनीत साहनी, मोहन अबोले, विजय शेंदरकर, अविनाश कव्हळे, रवी अग्रवाल, कपिल दहेकर, मोहन इंगळे, शंकरराव सवादे, दत्ता जाधव, संजय देठे, राजेंद्र जाधव, सुनील पवार, प्रकाश आचार्य, सुनील पाठक, अनिल कुलकर्णी, डॉ. प्रदीप पंडीत, डॉ. संजय मिसाळ, संजय चौधरी, दत्ता राऊत, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रकाश राऊत, अनिल व्यवहारे, सोमेश काबलिये यांच्यासह जालना गणेश महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, शहरातील डॉकटर, व्यापारी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आणि भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते.