जालना । प्रतिनिधी – जालना शहर हे बियाणाची पढरी असले तरी या शहराला सांस्कृतीक वारसा लाभला आहे, असे फेस्टीव्हलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी यावेळी सांगितले. तर मला आताशी तीन महिने झाले असले तरी ज्यांच्या नावे येथील नाट्यगृह आहे ते कृष्णराव फुलंब्रीकर हे मुळचे फुलंबीचे आहेत, त्यामुळे आपण नेहमीच या शहराशी जोडलो आहोत. असो, या फेस्टीव्हलची उंची अशीच वाढत जावो, अशी आपली सदिच्छा असल्याचे खा. डा. कल्याणराव काळे यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर खा.डॉ.कल्यांणराव काळे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आ. कैलास गोरंट्याल, पंडीतराव भुतेकर, शेख महेमुद, भास्करराव दानवे, भास्करराव अंबेकर, नंदकुमार जांगडे, नंदा पवार, सौ. निकाळजे, भाजपाचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, गणेश महासघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर, संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, डीवायएसपी श्री. कुलकर्णी, दिनेश फलके, राजेंद्र राख, अशोकराव आगलावे, किरण गरड, संजय देठे, सुभाषराव कोळकर, चंद्रशेखर वाळींबे, अशोक उबाळे, सतीष देशमुख, बाला परदेशी, विष्णू पाचफुले, शंकर लुंगे, प्रकाश जायभाये, विनायक महाराज फुलंब्रीकर, शरद देशमुख, राजेंद्र जैस्वाल, शुभम टेकाळे, रावसाहेब ढवळे, अनिरुध्द खोतकर, रमेश पा. गव्हाड, राजेश राऊत, मनिष तवरावाला, संजय दशमुख, जगन्नाथ काकडे, अजिक्य घोगरे, गणेश सुपारकर, मोहन इंगळे, उद्योजक कैलास लोया, भाऊसाहेब घुगे, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, डेव्हीड घुमारे, विनीत साहनी, अशोक पडुळ आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी अर्जुनराव खोतकर, भास्करराव दानवे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी फेस्टीव्हलच्या पदाधिकार्यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला तर श्री. गोरे यांनी खा. काळे यांचा शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार केला.
श्री.गोरे पुढे म्हणाले की, जालना शहर हे बियाणाची पंढरी असले तरी या शहराला सांस्कृतीक वारसा लाभला आहे. 9 सप्टेंबर रोजी ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील यांचे हरि हरि किर्तन होणार असून दि. 10 सप्टेंबर रोजी कलारंजन मुंबई निर्मित रंग तरंंग हा ऑकेट्रा होईल तर 11 सप्टेंबर रोजी ड्रीम गर्ल प्रिया पाटील व धिंगाणा क्वीन स्वाती मुंबईकर यांचा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम होणार असून दि. 12 सप्टेंबर रोजी जिव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण नाईट ्रे्रआणि दि. 13 सप्टेंबर रोजी भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित केदार शिंदे लिखीत दिग्दर्शीत तू तू मी- मी सिनेमॅटीक नाटक विविध भूमिकेत भरत जाधव, दि. 14 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचा आणि लोककलेचा पारंपारीक नृत्याविष्कार श्लोक निर्मीत अशी आमची माय मराठी हा मनोज माझीरे निर्मित आणि याचे सुत्रधार आहेत स्वप्नील कांडेकर, दि. 15सप्टेंबर रोजी आंतर राष्ट्रीय दर्जाचे बॉलीवुड स्टार अभिजीत घोषाल नाईट आणि दि. 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने समारोप होईल, असेही श्री. गोरे यांनी सांगितले. हे सर्व कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता होणार आहेत.
पुढे बोलतांना खा. काळे म्हणाले की, या समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आला. हा फेस्टीव्हलने राज्यात वेगवेगळ्या भागात या फेस्टीव्हलचा नाव लौकीक आहे. या कार्यक्रमाची उंची अशीच दिवसेंदिवस वाढत जावो, अशी शुभेच्छाही डॉ. खा. काळे यांनी व्यक्त केली.यावेळी हरिहर शिंदे, सुरेश मुळे, अवनिश गरड, बबनराव गाडेकर, सतिष देशमुख, प्रा. राजेंद्र भोसले, प्रशांत वाढेकर, संदीप गायकवाड आदींची उपस्थिती होती.