बदनापूर । प्रतिनिधी – येथील रेल्वे स्टेशन रोड वरील इनामदार कॉलोनी मधील शेख नजीर इनामदार यांच्या राहत्या घराच्या टपरी मधून रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास तीन मोठ्या आणि दोन लहान शेळ्या अज्ञात चोरट्यांनी पीक अप गाडीतून चोरून नेल्याची घटना घडली आहे . ह्या पाच शेळ्या अंदाजे 46 हजाराच्या आहे हे चोरटे सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून हे नेहमी दर दोन तीन महिन्यात बदनापूर शहरातून शेळ्या पीक अप गाडीतून चोरून नेतात मात्र या चोरट्यांचा बदनापूर पोलिसांनी अद्यापही शोध लावला नसल्याने या चोरट्यांची हिम्मत दिससोंदीवस वाढत चालली आहे यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही बदनापूर शहरात जनावरे चोरनारे असून संशयाच्या नजरेने पोलिसांनी अद्यापही एकही चोरट्याला पकडले नाही हे विशेष….
या बाबत बदनापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 नुसार कलम 303 /2 प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस जमादार बाबासाहेब जर्हाड करीत असल्याची माहिती ठाणे अमलदार वेलदोडे, आशिष दासर यांनी सांगितले.