वखारी येथे विविध विकासकामांचे भास्कर दानवे यांच्या हस्ते उदघाटन

21

जालना । प्रतिनिधी – मौजे वखारी ता. जि. जालना येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांच्या हस्ते पार पडला.
गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी जलजीवन मिशन सारख्या योजने अंतर्गत गावात पाणीपुरवठ्यासाठी 1 कोटी 45 लक्ष्य रुपयांचा निधी रावसाहेब दानवे यांनी मंजुर केला होता तसेच खासदार निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्र सभागृह बांधकामासाठी 15 लक्ष्य रूपये, विठ्ठल-रुख्मिणी व श्रीराम मंदिरासमोर सभामंडप बांधकामासाठी प्रत्येकी 10 लक्ष्य रूपये व वखारी तांडा येथे सि.सि. रोड व भूमिगत नालीच्या बांधकामासाठी 5 लक्ष्य रूपये निधी मंजूर करण्यात आला होता, यावेळी या पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे गावकर्‍यांच्या मागणीनुसार श्री सदानंद महाराज मंदिरासमोर सभामंडप बांधकामासाठी 10 लक्ष्य रूपये व दलितवस्तीसाठी स्मशानभूमी शेड चे बांधकामासाठी खासदार निधी अंतर्गत 8 लक्ष्य रूपये निधी मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आला आहे, यावेळी या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी बोलताना, गावात अजून विकासकामे निरंतर होतच राहतील, वखारी गावाला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. निवडणुकीच्या काळात काही खोट्या गोष्टी जनसमान्यात पसरविण्यात आल्या होत्या या पुढे अश्या गोष्टीना भुरळ न पडता गेली 25 वर्ष तुम्ही जी साथ दिली असेच यापुढेही राहूद्य, असे प्रतिपादन मा. भास्करआबा दानवे यांनी केले.
झालेल्या विविध विकास कामांसाठी ग्रामस्थांनी त्याच प्रमाणे गावातील अनेक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळाल्याबद्दल गावकर्‍यांनी मा. भास्करआबा दानवे यांचे आभार मानले. तसेच गावातील रहिवासी नारायण काळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी याप्रसंगी जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष भागवतबापू बावणे, तालुका अध्यक्ष वसंतराव शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास उबाळे, डउ मोर्चा जिल्हाअध्यक्ष अनिल सरकाटे, कपिल दहेकर, सुधाकर खरात, निवृत्ती लंके, नागेश अंभोरे, काकासाहेब घुले, गजानन घुले, गोवर्धन कोल्हे, विनायक राठोड, राजू उगले, ज्ञानेश्वर राठोड, पुजाराम भूतेकर, सुभाषराव भुतेकर, दीपक पडूळ, गौतम सरकाटे, संदीप बोर्डे, रमेश काळे, उत्तमराव घुले, रघुनाथ घुले, श्रीराम काळे, विक्रम खैरे, नरसिंग जाधव, सिद्धार्थ बोरुडे, रघुनाथ महाराज देशपांडे, भगवान सर खैरे, भरत घुले, गंगाधर क्षीरसागर, सुरेश शिंदे, देशपांडे महाराज यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.