टेंभुर्णी – प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजेच ईद मिलादुन्नबी निमित्त हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनतर्फे दरवर्षी प्रमाणे सलग 11व्या वर्षी देखील उर्दू माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे.यात फक्त उर्दू शिक्षक-शिक्षिका सहभाग घेऊ शकतात. यात विजेत्या शिक्षक-शिक्षिकांना रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षिस, प्रमाणपत्र तसेच शानदार स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल. उर्दू माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकांना निबंध स्पर्धेतील खालील विषयावरच निबंध लिहायचा आहे…
विषय-
सिरत मुस्तफा और हमारी बेटियां
या विषयांवरच 1000 ते 1200 शब्दात (4 ते 5 पेज )लिहून आपला नाव, शाळेचा नाव लिहून या पत्त्यावर पाठवायचं आहे. विनस फूट वेअर, शहीद भगतसिंग चौक, मेन रोड, सिल्लोड पिन कोड 431112.
टीप- निबंध हे लिहून पोस्टानेच पाठवायचे आहेत. आपले निबंध बंद पाकिटात पोस्टाने 21 सप्टेंबर (शनिवार) 2024च्या आत पोहचतील असे पाठवावे. याची सर्वानी नोंद घ्यावी. तसेच हँड टू हँड प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत फक्त पोस्टाने आलेले निबंधच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत…
महाराष्ट्र राज्यातील व औरंगाबाद जिल्ह्यातील मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक बंधू-भगिनिंसाठी दर वर्षी प्रमाणे सलग 11व्या वर्षी ही हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनतर्फे राज्य स्तरीय व जिल्हास्तरीय मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमांच्या सर्व शिक्षक-शिक्षकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आपले आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी केली आहे. राज्य स्तरावर मराठी माध्यमातुन 3 आदर्श शिक्षक पुरस्कार, उर्दू माध्यमातून 3 राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय मराठी मध्ये मनपा-1 , खाजगी-1 , जिल्हा परिषद-1 असे 3 आणि उर्दू माध्यम मध्ये जिल्हा परिषद-1 , खाजगी-1 , मनपातुन एक एक शिक्षक तसेच मराठी माध्यमातून 1 चित्रकला शिक्षक आणि उर्दू माध्यमातून चित्रकला शिक्षक तसेच मराठी माध्यमातून 1 क्रीडा शिक्षक व उर्दू माध्यमातून 1 क्रीडा शिक्षक असे एकूण 16 शिक्षक-शिक्षिकांची आदर्श शिक्षक पुरुस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे, तरी महाराष्ट्र राज्यातील व औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षिकांनी आपले प्रस्ताव 21 सप्टेंबर (शनिवार) 2024 पर्यंत पाठवावे. सर्व शिक्षक-शिक्षिकांनी काही अडचण किंवा शंका असल्यास तर हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर 9657524545 यांच्याशी संपर्क साधून आपला आपला प्रस्ताव सादर करावे असे आवाहन हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.