सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिन समाज कल्याण कार्यालयात उत्साहात साजरा  

102

जालना । समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अभिनव संकल्पनेतून सामाजिक न्याय विभागाचा 90 व्या स्थापना दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद या कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, दिव्यांगांना वैष्वीक ओळखपत्र वाटप, गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचा सत्कार, जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप आदी  कार्यक्रम 14 ऑक्टोबर 2022  घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी वैशाली हिंगे या तर प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्रदिप भोगले हे उपस्थित होते. तसेच सहाय्यक आयुक्त अमित घवले, विशेष अधिकारी (शा. नि. शा.) दत्तात्रय वाघ, सहाय्यक लेखाधिकारी दादाराव रगडे, कार्यालय अधिक्षक अतिष ससाने, पत्रकार अच्युत मोरे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे ज्ञानदेव पायगव्हाणे, धर्मा खिल्लारे, प्रविण कनकुटे, रेणुका भावसार इत्यादी मान्यवरांसह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प्रदिप भोगले, रेणुका भावसार, प्रविण कनकुटे यांनी यावेळी  मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक डी.एम. गिरी, यांनी आभार मानले.