जालना । प्रतिनिधी – नविन मोंढा जालना येथील मोहन एजन्सीज मध्ये रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास अज्ञात ईसमांनी दरोडा टाकुन रोख रक्कम 9,50,000/- रुपये, सिगारेटचे पाकीटे, उउढत ऊतठ, मोबाईल फोन चोरी केला व पांढर्या रंगाच्या कार मध्ये पळुन गेले होते. त्यावरुन पोलीस ठाणे चंदनझिरा येथे अशिष राजेंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्याद वरुन गुन्हा दाखल झालेला आहे.
गुन्हयाचे स्वरुप पाहता पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथील पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय बन्सल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथके तयार करुन गुन्हयाचा तांत्रीक तपास केला असता सदरचा गुन्हा ईसम नामे शेख आरेफ शेख साबेर रा. शेर सवार कॉलनी, तोतला पेट्रोल पंप जवळ, भोकरदन नाका जालना याने त्याचे साथीदार यांचे सह केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्याने पोलीसंकडे कबुली दिली की, त्याने व त्याचे सहा साथीदार यांचे सोबत मिळुन केला आहे. सदर ईसमास अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन अधिक तपास केला असता आरेफ शेख याचे कडुन दरोड्यातील एकुण रक्कमेपैकी रोख रक्कम 50,000/- रुपये व त्याने गुन्हा करतांना वापरलेली 20,000/- रुपये किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक चे शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चंदनझिरा पोलिसांनी प्रेस नोट द्वारे दिली.
तसेच पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीमधील निखील सारडा यांचे घरी देखील मी व माझे ईतर तीन साथीदार यांनी जबरी चोरी करुन सुमारे 9,60,000/- रुपये किंमतीचे दागीने व मोबाईल फोन चोरी केले असल्याची कबुली देखील शेख आरेफ शेख साबेर याने दिली आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजय बन्सल, मा. अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सम्राटसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, सचिन सानप, पोलीस हेड कॉन्टेबल रिंकु देशमुख, अशोक जाधव, साई पवार, पोलीस नाईक राजेंद्र पवार, अभिजीत वायकोस, पोलीस कॉस्टेबल नवनाथ पाटील, सागर खैरे यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे हे करत असुन फरार आरोपींचा कसोशीने शोध घेत आहेत.