जालना । प्रतिनिधी – आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जालन्यात पोलीस प्रशासनाने पथसंचलन केलंय. यात जालना शहरातील सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभगी झाले होते. 7 सप्टेंबर पासून गणेश उत्सव सुरू होतोय, तसेच या कालावधीत मुस्लिम समाजाचा ईदचा सण साजरा होणार आहे. या सण उत्सवांच्या काळात कोणीही दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन करू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी केलय. सण उत्सवांच्या काळात नागरिकांनी जातीय सलोखा अबाधित राहील याची काळजी घ्यावी, तसेच आगामी सण उत्सव शांततेत आणि आनंदात साजरे करावेत असं अनंत कुलकर्णी म्हणालेत. दरम्यान आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा दिला संदेश यावेळी रूटमार्कच्या माध्यमातून देण्यात आला आहे. मामा चौक येथून सुरू झालेले तसेच फुल बाजार, सराफा मार्केट, कादराबाद, पाणीवेस, मस्तगड, गांधी चमन, शनी मंदिर, मार्गांवरून पोलिसांचे पथसंचलन छत्रपती संभाजी उद्यान येथे दाखल झाले,त्यानंतर पथ संचलनाचा समारोप करण्यात आला. या पथसंचलन मध्ये शहरातील चारही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती होती.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंत कुलकर्णी, प्रोबेशनरी उपविभागीय पोलीस अधिकारी चौधरी मॅडम, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश राधाकिशन उणवणे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती,सह पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.