भोकरदन । प्रतिनिधी – येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशिनला हॅकिंग चीप लावून दोन अज्ञात चोरट्यांनी चाळीस हजार रुपये लंपास करणार्या दोघा चोरट्यांना पोलीसांनी गुजरात राज्यातील सांगबरा येथून ताब्यात घेतले घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि 31 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या ए.टी.एमला हॅकिंग चीप लावून दोन अज्ञात चोरटे ताक देत बसले होते दरम्यान एक ज्येष्ठ नागरिक एटीएम मध्ये पैसे काढण्यास आला असता त्याला बनवणी करून व एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगून मी पैसे काढून देतो तर त्या ज्येष्ठ नागरिकांनी कुठलाही विचार न करता एटीएम चोरट्याच्या ताब्यात दिले तितक्या चोरट्याने एटीएम कार्ड स्वैफ करून पैसे पैसे निघत नसल्याची बतावणी केली. नागरिक एटीएम मधून गेल्यानंतर आपल्या खात्यातून चाळीस हजार वजा झाल्याचा एस.एम.एस प्राप्त झाला.
तेव्हा आपल्या सोबत फसवणूक झाल्याचे कळताच भोकरदन पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची चौकशी दरम्यान तपास घेण्यात आला असता दोन अज्ञात चोरट्यांचे लोकेशन गुजरात राज्यात असल्याचे कळताच भोकरदन पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून गुजरात कडे रवाना केले व सदरील आरोपी गुजरात मधील सांगबरा येथे वर पळत ठेऊन दोघास तब्यात घेतले होते. सदरील आरोपी नामे अरशद खान व तौफिक चौकशीतुन एक मोटारसायकल 44 एटीएम व 14 हजार रुपये रोख रक्कम मोबाईल मिळाला आहे. तर पुढील तपास पोलीस करत असल्याचे सांगितले आहे. पोलीसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी परिसरातील अवैध धंद्यांवर बर्यापैकी अंकुश लावला असून गल्ली बोळात दहशत माजविणारे गुंड प्रवृत्तीच्या ‘भाईं’ वर कारवाईचा बडगा उचलला आहे. तसेच अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या प्रकरणातही पोनी बिडवे यांनी कार्यवाही करणे सुरु केले आहे.