टेंभुर्णी । प्रतिनिधी – राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणजे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब अंभोरे हे होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री एस आर फलटणकर सर यांनी केले तसेच पत्रकार रावसाहेब अंभोरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी खालील पालकांनी उपस्थिती दर्शविली त्यामध्ये लक्ष्मण जाधव, कैलास चव्हाण ,रुस्तुम सपाटे ,जोशी सर, अनिल मस्के, पवन उगले व महिला पालक सुभद्रा चव्हाण, रिजवान पठाण यांची उपस्थिती होती.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणातून आपला सहभाग नोंदला व शिक्षकांची भूमिका साकारली त्यामध्ये साक्षी वरगने, वैशाली सुद्रिक, अनुष्का भिसे, प्रेरणा सपाटे ,आराध्या कोरडे, आराध्या उबरहंडे, अंकिता म्हस्के, साधना चव्हाण, सीमा मस्के ,रीनाज पठाण, श्रावणी उखर्डे ,मनस्वी उगले ,आरोही जाधव ,सुबोध पवार ,जय रोकडे, अर्जुन पुंगळे ,यशराज भिसे, आरती चव्हाण, प्रतीक मोढेकर, भावेश कांबळे, सोहम म्हस्के, जनार्दन म्हस्के ,अथर्व भोरजे, प्रथमेश उखर्डे , सुमंत सवडे, रणवीर म्हस्के व युवराज चव्हाण हा शाळेचा मुख्याध्यापक होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा सपाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील साधना चव्हाण यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक विनोद उबरहंडे, अमोल तेलंग्रे, नवाज शेख, दत्तात्रय गाडेकर, विमल एस, भागवत लहाने, विनोद धवलीया, वनिता बोडखे, रोहिणी सोळुंके, वैष्णवी पिंपळे, सविता बकाल, स्नेहल रिंढे, सुनीता मोरे, अश्विनी दुनगहु, विमल मदन, प्रभाकर रोकडे, केशव पंडितकर, बाळू चव्हाण, अंकुश जोशी, इत्यादींची उपस्थिती होती