जालना – राज्याचे अल्पसंख्याक व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवार दि.4 सप्टेंबर 2024 रोजी रात्री उशीरा अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांच्या प्रमुख मागण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री मंडळातील सदस्यांसोबत मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण, अतिवृष्टीने शेती पिकांच्या नुकसानीसह इतर मागण्याबाबत चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. श्री. जरांगे यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांच्या मागण्याबाबत आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल. तसेच लवकरात लवकर सरकार जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे सांगून श्री.जरांगे यांच्याशी मराठा आरक्षण, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत आदी विषयावर चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.