आदिवासी समाजासाठी उपोषणच नाही तर जीवही देईल – ॲड.सुरेश काळे

13
परतूर |  प्रतिनिधी- परतुर वार्ड क्रमांक चार मध्ये दर्गा रोड होण्यासाठी बऱ्याच दिवसापासून ॲड.सुरेश काळे व समस्त आदिवासी पारधी समाज हा प्रशासनाशी लढत आहे. गेल्या वर्षी ॲड.सुरेश काळे यांनी पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालय यांच्या कार्यालयशी संपर्क साधून या सर्व नगरपरिषदेच्या गलथान कारभाराची माहिती ॲड.सुरेश काळे यांनी दिली असता पंतप्रधान कार्यालय सचिवालय मधून ॲड.सुरेश काळे यांच्याशी संपर्क साधला व सर्व कैफियत ॲड.सुरेश काळे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे मांडली त्या अनुषंगाने यांनी बजेटही उपलब्ध करून दिले. परंतु आलेले बजेट हे आदिवासी पारधी वाडा दर्गा रोड येथे वापरण्या ऐवजी दुसऱ्याच रस्त्यांना नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्थानिक राजकारणी लोकांनी  येथील रस्ता पळवला. आज जवळजवळ दहा ते बारा वर्षे झाली परंतु आदिवासी पारधी समाजाला येथील नगरपरिषद घरकुल देत नाही ना रस्ता  जे सर्व नागरिकांना मूलभूत गरजा आवश्यक असतात अशा कुठल्याही गोष्टीचा पुरवठा आदिवासी पारधी समाजाला केल्या जात नाही. त्याचप्रमाणे आदिवासी पारधी समाजातील काही नेतेमंडळी यांचा वापर फक्त येथील स्थानिक राजकारणी हे फक्त मतापुरताच करतात व निवडणूक जशा झाल्या तशा या लोकांकडे कोणीही लक्ष देत नाही.या सर्व गोष्टी ॲड.सुरेश काळे यांच्या लक्षात आल्या व त्यांनी समाज प्रबोधन व समाज कसा एकत्रित येईल याच्यावर भर दिला त्याच अनुषंगाने परतुर शहरांमध्ये नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या सर्वच रस्त्यांची कामे हे झालेले आहेत. फक्त पारधी वाडा वगळता येथील स्थानिक राजकारणी व जातीवादी नगरपरिषद प्रशासन हे जाणून बुजून जातीवादी धोरणातून अशी कामे करत आहे का? असा प्रश्न समाजाला पडला आहे.त्याच अनुषंगाने येत्या ०६/०९/२०२४,  रोजी ठीक.११:०० वाजता ॲड.सुरेश काळे यांनी उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे त्यांना पाठिंबा म्हणून सर्व समाज त्यांच्या पाठीमागे आहे.