जालना । जीर्ण मूर्ती वेस मुळे वर्षभरानंतरही वाहतुकीच्या दृष्टीने रेंगाळत पडलेली रहदारीची समस्या सोडविण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाने दिलेल्या निर्देशा नंतर पालिका प्रशासनाने मूर्ती वेस परिसरातील अतिक्रमण काढून शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा दिला. अशी प्रतिक्रिया विधीज्ञ ॲड.
महेश धन्नावत यांनी व्यक्त केली.
जीर्ण मूर्ती वेस चा रस्ता रहदारीस मोकळा करावा यासाठी ॲड. महेश धन्नावत यांनी प्रशासनासह मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला. मात्र तोडगा निघत नसल्याने अखेर त्यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे रितसर तक्रार दाखल केली .आयोगासमोर दोन वेळेस सुनावणी झाली. रस्ता मोकळा करण्यासंदर्भात पुढील सुनावणी पर्यंत शपथपत्र सादर करण्याचे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगाने प्रशासनास दिले होते. त्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासनाने आज मूर्तीवेस परिसरातील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यास हालचाली केल्या असून पुढील कार्य जलद गतीने व्हावे. अशी अपेक्षाही ॲड. महेश धन्नावत यांनी व्यक्त केली .